Join us

रेल्वे रुळावरील पादचारी पूल ओस, प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 1:45 AM

प्रशासनाचे दुर्लक्ष : सीबीडीत धोकादायक प्रवास

नवी मुंबई : सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक आणि सानपाडा रेल्वे कारशेड या ठिकाणच्या उड्डाणपुलाशेजारील पादचारी पुलांचा नागरिक वापर करीत नसल्याने हे पादचारी पूल वर्षानुवर्षे ओस पडले आहेत. नागरिक रेल्वे रु ळावरून ये-जा करत आहेत.

नवी मुंबई शहरात रेल्वेरूळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाच्या शेजारी पादचारी पुलांची निर्मिती केली आहे. सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकाच्या समोरील उड्डाणपुलाशेजारील बेलापूर आणि अग्रोळीगावाला जोडणारा पादचारी पूल आणि सानपाडा रेल्वे कारशेडकडे जाणाऱ्या रेल्वेरु ळाजवळील सेक्टर ८ आणि सेक्टर १५ यांना जोडणारे पादचारी पूल बांधण्यात आले आहेत; परंतु हे पूल बांधल्यापासून त्यांचा वापरच झालेला नाही, त्यामुळे या पुलांची दुरवस्था झाली आहे. वापर होत नसलेल्या या पादचारी पुलांवर गवत उगवले असून कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. पादचारी पुलावरून जाण्याचा कंटाळा करणारे नागरिक जीवघेणा प्रवास करीत रेल्वे मार्ग ओलांडत आहेत. नागरिकांनी रेल्वेरूळ ओलांडू नये, यासाठी रेल्वेरु ळाशेजारी संरक्षक भिंती बांधल्या आहेत; परंतु या भिंती तोडण्यात आल्या असून रेल्वे रु ळावरून नागरिकांची ये-जा सुरू असते. सानपाडा कारशेड रेल्वेमार्गावर संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही. वापर होत नसल्याने या दोन्ही ठिकाणी लाखो रुपये खर्च करून बांधलेले पादचारी पूल ओस पडले आहेत. 

टॅग्स :रेल्वेनवी मुंबई