श्रीकृष्ण नदी वरील पादचारी पूल सुरू झाल्याने हजारो पादचारी नागरिकांना मिळाला दिलासा
By मनोहर कुंभेजकर | Published: February 28, 2023 06:46 PM2023-02-28T18:46:11+5:302023-02-28T18:46:29+5:30
उपनगर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या आदेशानुसार काल बोरिवली पूर्व नॅशनल पार्क जवळ असलेला श्रीकृष्ण नदी वरील पादचारी पूल सुरू झाल्याने हजारो पादचारी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई-उपनगर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या आदेशानुसार काल बोरिवली पूर्व नॅशनल पार्क जवळ असलेला श्रीकृष्ण नदी वरील पादचारी पूल सुरू झाल्याने हजारो पादचारी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग क्र.११ मधील श्रीकृष्ण नगर नदीचा पादचारी पूल काल जेष्ठ नागरिकांंच्या हस्ते उद्घाटन करुन खुला करण्यात आला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर,युवासेना कार्यकारी सदस्य राज प्रकाश सुर्वे,महिला विभागप्रमुख सौ.मीना पानमंद, उपविभागप्रमुख राजेश कासार ,अमोल विश्वासराव, शाखाप्रमुख सुभाष येरुणकर, महिला शाखाप्रमुख समिना माहीमकर, संतोष दावडे,सुशील दळवी, सचिन कदम, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर पूल बंद असल्याने वाहनांना व नागरिकांना गोकुळ आनंद हॉटेल मार्गे,श्रीकृष्ण नगर,नॅन्सी कॉलनी आणि परिसरात पायपीट करत यावे लागत होते व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.
मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील बोरिवली पूर्व नॅशनल पार्क लगत असलेल्या प्रभाग क्र.११ मधील श्रीकृष्ण नदीवरील पूल धोकादायक झाल्याने सदर पूल पाडून येथे मुंबई महानगर पालिकेतर्फे नवीन पूल बांधण्याचे काम जोमाने सुरू आहे. आमदार प्रकाश सुर्वे तसेच गणेश खणकर यांच्या प्रयत्नाने श्रीकृष्ण नगर नदी पुलाच्या बांधकाम पाहणीसाठी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच खासदार गोपाळ शेट्टी यांचा पहाणी दौरा नुकताच आयोजित करण्यात आला होता.
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचा पादचारी पूल लवकर रहदारीसाठी खुला करा. तसेच पूल दोन्ही बाजूला रस्त्याला उतार करून जोडावा .हे काम देखील पंधरा दिवसात पूर्ण करून पूलाचा पहिला टप्पा रहिवाशांच्या सोयीसाठी नागरिकांच्या रहदारीसाठी खुला करण्यात यावा असे आदेश दिले.तसेच वनविभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राच्या विषयासंदर्भात तातडीने माहिती सादर करणे जेणेकरून दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होईल. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी हे तत्वतः मान्य केले.त्यामुळे येत्या १५ दिवसात पूलाचा पहिला टप्पा वाहतुकीला खुला होणार असल्याचा विश्वास खणकर व राज सुर्वे यांनी यावेळी व्यक्त केला.