परळ, एल्फिन्स्टन स्थानकांत सरकते जिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 07:16 AM2018-02-01T07:16:11+5:302018-02-01T07:16:15+5:30
लष्करातर्फे उभारण्यात येणाºया एल्फिन्स्टन-परळ पादचारी पुलाची पाहणी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी केली. या वेळी सायन ते परळ असा प्रवास त्यांनी लोकलने केला. परळ आणि एल्फिन्स्टन स्थानकांत सरकते जिने बसविण्याचे आदेश गोयल यांनी रेल्वे अधिकाºयांना दिले.
मुंबई : लष्करातर्फे उभारण्यात येणाºया एल्फिन्स्टन-परळ पादचारी पुलाची पाहणी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी केली. या वेळी सायन ते परळ असा प्रवास त्यांनी लोकलने केला. परळ आणि एल्फिन्स्टन स्थानकांत सरकते जिने बसविण्याचे आदेश गोयल यांनी रेल्वे अधिकाºयांना दिले. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई दौरा आयोजित
केल्यामुळे मुंबईकरांच्या अर्थसंकल्पाबाबत अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.
अतिशय गोपनीय पद्धतीने रेल्वेमंत्री यांचा मुंबई दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौºयाची पूर्वकल्पना माध्यम प्रतिनिधींनाही देण्यात आली नव्हती. परळ स्थानकात भेट देताना रेल्वेमंत्री यांच्या समवेत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता उपस्थित होते. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पादचारी पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या स्थानकांवर सरकते जिने बसविण्याचा धडाका सुरू केला.
मुंबई दौºयावर असलेल्या गोयल यांनी परळ आणि एल्फिन्स्टन स्थानकांत सरकते जिने उभारावेत, असे आदेश दोन्ही रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिले. लष्कराने एल्फिन्स्टन-परळ पादचारी पूल उभारला आहे. या पुलाच्या छताचे आणि पायºयांचे काम बाकी आहे. त्याच्या पूर्णत्वासाठी सुमारे तीन आठवडे लागण्याची शक्यता आहे. परिणामी लष्करी पुलाचे उद्घाटन एकाच वेळी करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली. परळ स्थानक सुशोभित करण्याच्या सूचना रेल्वेमंत्री गोयल यांनी संबंधित रेल्वे अधिकाºयांना दिल्या. त्याचबरोबर प्रवाशांना फलाटांवर जास्तीतजास्त मोकळी जागा मिळावी यासाठी परळ स्थानकातील फूड स्टॉल आणि वॉटर वेंडिंग मशीन दूर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
लष्करामार्फत उभारण्यात येणाºया लष्करी पादचारी पुलाचे काम १ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे. प्रवाशांसाठी पादचारी पूल केव्हा खुला करायचा याचा निर्णय रेल्नेमंत्री यांनी घ्यायचा आहे. लष्कराला पूल उभारण्याची जबाबदारी दिली होती. लष्कराने ती वेळेत पूर्ण केली आहे, अशी माहिती लष्करातील वरिष्ठ अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
करी रोड पुलासाठी देशातील रेल्वे अधिकारी मुंबईत
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर लष्करामार्फत आंबिवली, करी रोड आणि एल्फिन्स्टन येथे पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी देशातील १६ मंडळांतील अधिकाºयांनी लष्करी पादचारी पुलाला भेट द्यावी अशी सूचनाही केली होती.
मात्र अद्याप एकाही मंडळातील अधिकाºयांनी लष्करी पादचारी पुलाला भेट दिली नाही. परिणामी ४ फेब्रुवारी रोजी करी रोड पूल उभारणीच्या वेळेस देशातील १६ विभागांतील अधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली.