पेणच्या मूर्ती वेस्ट इंडिजला

By admin | Published: January 5, 2017 04:20 AM2017-01-05T04:20:08+5:302017-01-05T04:20:08+5:30

या वर्षी २५ आॅगस्टला गणरायाचे आगमन होणार आहे.

Pen images of West Indies | पेणच्या मूर्ती वेस्ट इंडिजला

पेणच्या मूर्ती वेस्ट इंडिजला

Next

दत्ता म्हात्रे, पेण
या वर्षी २५ आॅगस्टला गणरायाचे आगमन होणार आहे. मात्र, आतापासूनच बाप्पांच्या सुखकर आगमनासाठी परदेशस्थ अनिवासी भारतीय गणेशभक्तांनी पेण येथून गणेशमूर्ती नेण्यास प्रारंभ के ला
आहे.
२०१७ या नववर्षाच्या प्रांरभीच पेणच्या दीपक कला केंद्रातून २५० छोट्या-मोठ्या सुबक गणेशमूर्ती वेस्ट इंडिज बेटावर सोमवार, २ जानेवारी २०१७ रोजी सुखरूप रवाना झाल्या. बाप्पाच्या परदेशवारीत वेस्ट इंडिज बेटावरची ही आजवरची
पहिली आॅर्डर दीपक कला केंद्राने
पूर्ण केल्याने, यंदाचा गणेशोत्सवाचा पडघम नववर्षाच्या प्रारंभापासून
वाजू लागल्याचे चित्र
पेणच्या कार्यशाळांमध्ये दिसून येत आहे.
तब्बल ४५ दिवसांच्या दीर्घ सागरी प्रवासानंतर बाप्पांच्या मूर्ती वेस्ट इंडिजमध्ये पोहोचणार असून, बॉक्स पॅकिंग व वुडन बॉक्स पॅॅकिंगमधील तब्बल २५० श्रींच्या मूर्ती वेस्ट इंडिज बेटावर प्रथमच रवाना झाल्याचे मूर्तिकार दीपक समेळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Pen images of West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.