कचरा टाकणाऱ्यांना जागीच दंड

By Admin | Published: February 19, 2015 11:01 PM2015-02-19T23:01:47+5:302015-02-19T23:01:47+5:30

शहरातील रस्त्यांबरोबर आपला परिसरदेखील नागरिकांनी स्वच्छ ठेवावा, या उद्देशाने पालिकेने ठोस पावले उचलली आहेत.

Penalties for those who are littering | कचरा टाकणाऱ्यांना जागीच दंड

कचरा टाकणाऱ्यांना जागीच दंड

googlenewsNext

ठाणे : शहरातील रस्त्यांबरोबर आपला परिसरदेखील नागरिकांनी स्वच्छ ठेवावा, या उद्देशाने पालिकेने ठोस पावले उचलली आहेत. त्यानुसार, आता शहर अथवा आपला परिसर अस्वच्छ करणाऱ्या ठाणेकरांना आता दंड भरावा लागणार आहे. यासाठी महापालिका प्रथमच सफाई मार्शलची नेमणूक करणार आहे. हे मार्शल आॅन दी स्पॉट दंड आकारून परिसर अस्वच्छ करू पाहणाऱ्यांना शिक्षा करणार आहेत.
ठाणे महापालिकेने यापूर्वी अशा प्रकारे विविध योजना आणल्या होत्या. शहरातील मुख्य रस्त्यांची रात्रीच्या वेळेस वॉटर टँकरच्या साहाय्याने सफाई करणे, रस्त्यांसह आपला परिसर अस्वच्छ होऊ नये यासाठी किरकोळ दंड आकारणी करणे आदींसह इतर माध्यमांतून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांनी २०११ मध्ये सफाई मार्शलची नियुक्ती केली होती. परंतु, पालिकेचा हा प्रयत्न फसला. रस्त्यांवर, फूटपाथवर कचरा टाकू नये, यासाठीदेखील जनजागृतीच्या माध्यमातून प्रयोग केले आहेत. मात्र, ते सर्व फसले आहेत़
आता नवे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणेकरांना शिस्त लागावी, त्यांनी आपला कचरा कचराकुंडीत अथवा घंटागाडीत टाकावा, या उद्देशाने आता सफाई मार्शलची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मार्शल आॅन दी स्पॉट दंड आकारणी करणार आहेत.
मात्र, ही दंड आकारणी कशी असेल आणि किती दंड आकारला जाईल, याबाबत मात्र पालिकेने अद्यापही धोरण ठरविलेले नाही. परंतु, पुढील महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव पटलावर ठेवला जाईल, असा आशावाद प्रशासनाने व्यक्त केला आहे.
परंतु, विविध शासकीय सेवांतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची याकामी नेमणूक केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यासाठी २०१५-१६ च्या मूळ अंदाजपत्रकात १ कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे. तसेच यापुढे शहरातील मुख्य रस्ते हे यांत्रिक पद्धतीने साफ करण्यासाठी पावले उचलली आहेत.
(प्रतिनिधी)

मागील वर्षी घनकचरा विभागाला अशा प्रकारे ७.५० लाखांचे टार्गेट देण्यात आले होते. परंतु, त्यांनी २ ते ३ लाखांपर्यंतच ते पूर्ण केले आहे. आता या नव्या प्रयोगामुळे तिजोरीत जास्तीची रक्कम जमा होईल, असा विश्वास पालिकेला आहे.

Web Title: Penalties for those who are littering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.