Join us

‘प.रे.’वर पाच दिवसांत १३.९७ लाखांची दंडवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 6:04 AM

पश्चिम रेल्वे प्रशासनाने १५ ते २० मे या पाच दिवसांत विनातिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईत तब्बल १३ लाख ९७ हजारांचा दंड वसूल केला आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाने १५ ते २० मे या पाच दिवसांत विनातिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईत तब्बल १३ लाख ९७ हजारांचा दंड वसूल केला आहे.मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, खार, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि नालासोपारा या स्थानकांवर ही कारवाई करण्यात आली.प.रे.चे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले की, गर्दीच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर, जिन्यांच्या ठिकाणी, प्रथम श्रेणीच्या डब्याजवळ १५ ते २० मेदरम्यान १६० तिकीट तपासनीस आणि पाच रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे या पाच दिवसांत ५ हजार १३० विनातिकीट प्रवाशांना पकडून १३ लाख ९७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.विनातिकीट प्रवाशांना पकडण्याची मोहीम सुरूच राहणार असून प्रवाशांनी योग्य प्रवासाचे तिकीट खरेदी करूनच प्रवास करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.वर्षभरात १४४ कोटी ९६ लाख रुपये वसूलपश्चिम रेल्वे मार्गावर एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत तब्बल १४४ कोटी ९६ लाख रुपयेदंड वसूल करण्यात आला आहे. विनातिकीट प्रवासी, मेल-एक्स्प्रेस आणि लोकलमधून अनारक्षित साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रवाशांच्या ३० लाख ४८ हजार तक्रारी नोंदविल्या आहेत.