वेळेत काम न करणाऱ्या दुकानदारास दंड

By admin | Published: October 25, 2015 02:27 AM2015-10-25T02:27:21+5:302015-10-25T02:27:21+5:30

दुरुस्तीला दिलेली चामड्याची बॅग व आॅर्डर दिलेली नवीन बॅग ग्राहकाला वेळेत न देणाऱ्या दुकानदारास ठाणे जिल्हा ग्राहक मंचाने चांगलाच दणका दिला आहे. नवीन बॅगेसाठी

The penalty for the shopkeeper who does not work in time | वेळेत काम न करणाऱ्या दुकानदारास दंड

वेळेत काम न करणाऱ्या दुकानदारास दंड

Next

मुंबई : दुरुस्तीला दिलेली चामड्याची बॅग व आॅर्डर दिलेली नवीन बॅग ग्राहकाला वेळेत न देणाऱ्या दुकानदारास ठाणे जिल्हा ग्राहक मंचाने चांगलाच दणका दिला आहे. नवीन बॅगेसाठी आगाऊ रक्कम म्हणून दिलेले १ हजार रुपये २०१०पासून
९ टक्के व्याजाने देण्याचे आदेश ग्राहक मंचाने ठाण्यातील दुकानदाराला दिले आहेत; तसेच जुनी बॅग दुरुस्त करण्याचेही निर्देश दुकानदाराला दिले आहेत.
ठाण्याच्या मुक्ता श्रीवास्तवा यांनी जुन्या बॅगची चेन बदलून देण्याची व त्याच बॅगच्या डिझाईनप्रमाणे नवीन बॅग बनवून देण्याची आॅर्डर प्रा. रियल बॅग सेंटरला २०१०मध्ये दिली. नव्या बॅगसाठी त्यांनी आगाऊ १ हजार रुपये दिले. त्यानंतर अनेकवेळा दुकानदाराकडे खेटे घालूनही त्याने दोन्ही बॅग्स परत केल्या नाहीत. दोन महिन्यांनी पतीला बाहेरगावी जायचे असल्याने दुकानदाराला जुनी बॅग तातडीने परत करण्यास सांगितले. मात्र त्याने ती देण्यास नकार दिला. त्यामुळे दुकानदाराला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. ही नोटीस स्वीकारण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहक मंचाकडे तक्रार केली, असे श्रीवास्तवा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
(प्रतिनिधी)

ग्राहक मंचाचे आदेश
सुनावणी करताना ग्राहक मंचाने दुकानदाराने सेवेत कसूर केल्याचे म्हणत दुकानदाराला १ हजार रुपयांवर २०१०पासून ९ टक्के व्याज श्रीवास्तव यांना देण्यास सांगितले. तसेच मानसिक त्रास दिल्याबद्दल ५ हजार रुपये आणि जुनी बॅग नोव्हेंबरतपर्यंत दुरुस्त करून देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दुकानदाराला दिले आहेत.

Web Title: The penalty for the shopkeeper who does not work in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.