सरळगाव : मुरबाड तालुक्यातील पाणीपुरवठा उपअभियंते, खाजगी तंत्रज्ञ व समितीचे अध्यक्ष, सचिवांच्या खाबुगिरीमुळे २००३ पासूनच्या १९८ पाणीपुरवठा योजनांपैकी ८० टक्के योजना अपूर्ण तर २० टक्के निकृष्ट असूनही पूर्ण दाखवलेल्या आहेत. या योजनांचा बोजवारा करणा-या मुजोर पाणीपुरवठा उपअभियंता एम.ए. लंबाते यांनी माहिती देण्यास नकार दिल्याने माहिती आयुक्त, कोकण खंडपीठाने त्यांना २५ हजारांचा दंड केला. महिलांची पाण्यासाठीची भटकंती कमी करून पाणीटंचाईचा प्रश्न मिटविण्यासाठी स्वच्छता व संपूर्ण पाणीपुरवठा, जलस्वराज योजनेखाली शासनाने १९८ पाणीपुरवठा योजनांसाठी ७५ कोटींचा खर्च टाकलेला आहे. या योजना लवकरात लवकर पूर्ण होऊन महिलांची डोक्यावरून पाणी आणण्याची भटकंती दूर व्हावी, म्हणून योजना अपूर्ण असलेल्या गावांतून कित्येक वेळा मोर्चे-आंदोलने झाली. आजपर्यंत पाणी काही आलेच नाही. तत्कालीन उपअभियंते एम़ए. लंबाते यांनी पाणीपुरवठा अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व ग्रामसेवकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.
मुरबाडमधील पाणीपुरवठा अभियंत्याला दंड
By admin | Published: January 04, 2015 10:47 PM