मुंबई : राज्यातील उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांनी सोमवारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.अल्पसंख्याक शाळांमध्ये २० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक निश्चित करावा, राज्यातील उर्दू शाळेतील शिक्षकांचे प्रश्न त्वरित सोडवावेत, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. संघटनेचे संस्थापक साजिद निसार अहमद व राज्य अध्यक्ष मेहबूब तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये आपल्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभाग घेतला होता. उर्दू शाळेच्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
प्रलंबित मागण्या; उर्दू शिक्षकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:53 AM