विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने वितरित करावी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:05 AM2021-09-03T04:05:28+5:302021-09-03T04:05:28+5:30

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना विविध विभागाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क देण्यात येते. परंतु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येत ...

Pending scholarships for students should be distributed immediately - Higher and Technical Education Minister Uday Samant | विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने वितरित करावी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने वितरित करावी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

googlenewsNext

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना विविध विभागाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क देण्यात येते. परंतु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या अडचणी तातडीने दूर करून दोन वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.

मंत्रालयात विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीला संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री सामंत म्हणाले की, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याबरोबरच त्यांना सर्व सुविधासुद्धा वेळेत उपलब्ध झाल्या पाहिजेत. अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात, अशा तक्रारी आल्या आहेत. शिष्यवृत्तीअभावी विद्यार्थी आणि संस्था अडचणीत येत आहेत. यासाठी संबंधित विभागाने समन्वयातून या अडचणी तातडीने दूर कराव्यात. मागील दोन वर्षापासून जी शिष्यवृत्ती प्रलंबित आहे ती तातडीने वितरित करण्यात यावी. तसेच ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग आणि संबंधित विभागाने आठवडाभरात बैठक घेऊन आढावा घ्यावा आणि त्रुटी दूर करून शिष्यवृती वितरित करावी. प्रत्येक महिन्याला याबाबत आढावा घेण्यात यावा, अशा सूचनाही सामंत यांनी यावेळी केल्या.

विद्यार्थ्यांची कागदपत्रे देण्यास महाविद्यालयांनी नकार देऊ नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, याबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या तर संबंधित महाविद्यालयावर कारवाई करण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Pending scholarships for students should be distributed immediately - Higher and Technical Education Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.