Join us

राणीच्या बागेत अवतरणार पेंग्विन!

By admin | Published: August 20, 2014 2:35 AM

भायखळा येथील महापालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय याचा कायापालट सुरू असतानाच आता या प्राणिसंग्रहालयात मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन घडणार आहे.

मुंबई : भायखळा येथील महापालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय याचा कायापालट सुरू असतानाच आता या प्राणिसंग्रहालयात मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन घडणार आहे. प्राणिसंग्रहालयात ‘हम्बोल्ट पेंग्विन’ पक्षी प्रदर्शित करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, बुधवारी होणा:या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे.
महापालिकेने उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या अनुषंगाने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या सुधारित आराखडय़ास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने अंतिम मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एक्स्प्लोरेशन सेंटरचे काम हाती घेण्यात आले आहे. याच सेंटरमध्ये खास आकर्षण म्हणून ‘हम्बोल्ट पेंग्विन’ हा पक्षी प्रदर्शित करण्यात येणार आहे. याबाबत नवी दिल्ली येथील केंद्रीय  प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात एकूण 2क् हम्बोल्ट पेंग्विन पक्षी आणण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये 1क् नर व 1क् मादी पक्ष्यांचा समावेश आहे. तथापि, सध्या हम्बोल्ट पेंग्विन पक्ष्यांच्या तीन जोडय़ा म्हणजेच 3 नर व 3 मादी आणण्याचे प्रस्तावित करण्यात आले 
आहे. (प्रतिनिधी)
 
च्हम्बोल्ट पेंग्विन पक्षी महापालिकेच्या उद्यानात आणण्यासाठी एकूण खर्च 
अंदाजे रुपये 2 कोटी 
57 लाख 1 हजार 159 
इतका असणार आहे.
च्हम्बोल्ट पेंग्विन हा पक्षी प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील मध्य चिली देशाच्या किनारपट्टी भागात समशितोष्ण कटिबंधात आढळतो.
 
च्महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील वातावरणदेखील हम्बोल्ट पेंग्विन पक्ष्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनुकूल आहे.
च्या पक्ष्यांचे आयुर्मान अंदाजे 3क् वर्षाचे असून, ते वर्षातून दोनदा अंडी देतात व सुमारे 4क् दिवसांत पिलांना जन्म देतात.
 
च्प्राणिसंग्रहालयात नव्याने बांधण्यात आलेल्या एस्क्प्लोरेशन सेंटरच्या तळमजल्यावर पक्षीगृह तयार केले असून, यामध्ये पेंग्विन पक्ष्यांकरिता 1क्क् चौरस मीटरचा पिंजरा बांधण्यात येणार आहे.
च्पेंग्विनला त्याच्या नैसर्गिक गरजा भागविण्याकरिता गुहा, बीळ तसेच बसण्याकरिता मोठे दगड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.