Join us

पेंग्विन लवकरच देणार गोड बातमी; मुंबईकरांची उत्सुकता शिगेला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 9:31 PM

चक्क राणीबाग प्रशासनाकडे चिमुकलीने आकर्षक नावांची यादीच पाठवली आहे 

मुंबई – लवकरच भायखळ्याच्या वीरमाता जीजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात अर्थात राणीच्या बागेत अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाळणा हलणार आहे. आणखी दोन छोटे पेंग्विन आई-बाबांसह पाण्यात सूर मारताना पाहता येणार आहेत. अडीच वर्षांच्या हेबोल्ट पेंग्विनच्या अंड्याला आज 40 दिवस पूर्ण होत आहेत. याबाबत बोलताना राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी अंडी फुटुन बाहेर येण्याचा कालावधी हा ४० ते ४५ दिवस इतका असतो. त्यामुळे अजून प्रतीक्षा करावी लागेल असे त्यांनी पुढे सांगितले. आज स्वातंत्र्यदिनी मुंबईतील पेंग्विन कुटुंबामध्ये चिमुकला पाहुणा येणार का? याचे औत्सुक्य मुंबईकरांना लागले आहे. अशातच पाळणा हलण्याची गोड बातमी पसरताच पेंग्विनच्या पिल्लाला आपणच सूचवलेले नाव ठेवावे, असा हट्ट एका चिमुरडीने धरला आहे. या चिमुकलीने चक्क राणी बाग प्रशासनाकडे आकर्षक नावांची यादीच पाठवली आहे. 

बंदिस्त वातावरणात जन्माला येणारे हे देशातील पहिले पेंग्विन ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसांत पेंग्विनचा जन्म होणे अपेक्षित आहे. या पिल्लाचे नाव मीच ठेवणार असा बालहट्ट अंधेरीतील 6 वर्षांच्या  मिष्का मंगुर्डेकर हिने धरला आहे. मिष्का जुहू येथील बेसंट मॉन्टेसरी शाळेत पहिल्या वर्गात शिकते. तिने राणी बाग प्रशासनाला नावांची यादी पत्राने पाठवली आहे. पेंग्विनचे पिल्लू नर असल्यास त्याचे नाव अपॉलो, कुकी, वॉडलर आणि मादी असल्यास तिचे नाव वेलव्हेट, व्हॅनिला, आईस क्यूब यापैकी ठेवण्याचा आग्रह तिने धरला आहे.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र