Join us  

पेंग्विनचे बारसे झाले थाटात! तीन पिलांचे नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:50 PM

गांडूळ खत तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात शुक्रवारी नामकरण सोहळा पार पडाला. उद्यनातील  पेंग्विनच्या कुटुंबाची वंशवेल चांगलीच बहरू लागली आहे. अलीकडेच जन्माला आलेल्या तीन पेंग्विन पिलांचे नामकरण करण्यात आले. गेल्या दोन ते अडीच वर्षांत पेंग्विनची संख्या आठ वरून अठरा वर पोहोचली आहे. 

 मोल्ट आणि फ्लिपरचे बाळ कोको (मादी), पोपॉय व ऑलिव्हचे बाळ स्टेला (मादी) आणि डोनाल्ड आणि डेझीचे बाळ जेरीचे (नर) नामकरण करण्यात आल्याची माहिती उद्यान व प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.  तसेच उद्यनातील विविध वनस्पतींवर आधारीत नवी मालिका सिल्वन फॉरेस्टच्या प्रोमो व्हिडीओचे अनावर करण्यात आल्याची माहिती डॉ. अभिषेक साटम यांनी दिली. यावेळी उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी उपस्थित होते. 

उत्पन्न आता एक ते सहा लाखांपर्यंतगेल्या  काही वर्षात या ठिकाणी नवे प्राणी-पक्षी आणले गेल्याने पर्यटकांचा ओघ वाढला आहे.  २०१७ मध्ये पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या हजारोंनी वाढली आहे. दररोज पाच ते सहा हजार, शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पंधरा ते सोळा हजार तर रविवारी पर्यटकांची संख्या वीस हजारांवर जात आहे. त्यामुळे याआधी दररोज १५ ते २० हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता एक ते सहा लाखांपर्यंत गेले आहे. तर सरासरी उत्पन्न प्रतिदिवस दीड लाख तर महिन्याचे सरासरी उत्पन्न ४५ लाखांवर गेले आहे. 

प्रोजेक्ट मुंबई या संस्थेने प्लॅस्टिक पासून तयार केलेले १५ बेंचेस, मनराव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्राणिसंग्रहालयास मिळालेल्या ५ व्हीलचेअर्स देखील  हस्तांतरित करण्यात आल्या.  

गांडूळ खत प्रकल्पावर काम करणार्या माळी कर्मचार्यांनी केलेल्या गांडूळ खत विक्रीच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई