Join us

CoronaVirus News in Mumbai: ‘त्या’ ज्येष्ठांची पेन्शन वाढणार , १५ वर्षे पेन्शन घेतलेल्या वयोवृद्धांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 5:09 AM

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या या निर्णयामुळे काही पेन्शनर्सना थोडा दिलासा मिळेल. नव्या योजनेमुळे सुमारे सात लाख पेन्शनर्सना आर्थिक फायदा होणार असून सरकारच्या तिजोरीवर मासिक १४०० ते १६०० कोटींचा भार पडेल, असा अंदाज आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बँकेतील मुदत ठेवींवरील व्याजाचे दर झपाट्याने कमी होत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक कोंडी होण्याची चिन्हे आहेत. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या या निर्णयामुळे काही पेन्शनर्सना थोडा दिलासा मिळेल. नव्या योजनेमुळे सुमारे सात लाख पेन्शनर्सना आर्थिक फायदा होणार असून सरकारच्या तिजोरीवर मासिक १४०० ते १६०० कोटींचा भार पडेल, असा अंदाज आहे.२००८ सालापर्यंत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकूण पेन्शनच्या रकमेपैकी एकतृतीयांश निधी एकरकमी घेण्याची मुभा होती. त्यानंतर उर्वरित रकमेच्या आधारावर त्यांना मासिक पेन्शन अदा केली जात होती. ज्या कर्मचाºयांनी या पद्धतीचा अवलंब केला होता त्यांना गेली १५ वर्षे दोनतृतीयांश रकमेवर पेन्शन अदा केली जात होती. ती आता १०० टक्के रकमेवर मिळेल. मे महिन्यापासून ही पेन्शन द्या, असे आदेश असले तरी पीएफ कार्यालयांमधील यंत्रणांमध्ये त्याच्या नोंदी पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे थोडा विलंब होण्याची शक्यता पीएफ अधिकाºयांनी व्यक्त केली आहे. १५ वर्षे पेन्शनच्या कालावधीची अट असल्याने १ एप्रिल, २००५ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना त्याचा लाभ मिळू शकतो. तसेच, निवृत्तीनंतर १०० टक्के निधीवर १५ वर्षे पेन्शन घेणाºयांचा या योजनेत समावेश होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.।फायदा कसा? : निवृत्तीच्या वेळी ५ हजार रुपये पेन्शन लागू असलेल्या कर्मचाºयाने जर निवृत्तिवेतनाच्या एकूण रकमेपैकी एकतृतीयांश रक्कम काढून घेतली, तर त्यांना साधारणत: ३,५०० रुपयेच पेन्शन मिळत होती. १५ वर्षे ही पेन्शन घेतल्यानंतर यापुढे दर महिन्याला त्यांना मूळ रक्कम म्हणजेच पाच हजार रुपये पेन्शन मिळू शकेल.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस