Join us

मंदिराचे श्रेय भलतेच लोक घेत आहेत : उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 9:05 AM

भाजप, विश्व हिंदू परिषदेच्या मुंबईतील काही आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी संघर्ष करणारे लोक वेगळेच होते, त्यांना बाजूला सारण्यात आले आणि भलतेच लोक श्रेय घेत आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केली.

भाजप, विश्व हिंदू परिषदेच्या मुंबईतील काही आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला संपविण्याचे खूप प्रयत्न सुरू आहेत. माझे त्यांना आव्हान आहे की, शिवसेना संपवून दाखवाच. आम्ही त्यांच्याशी शत्रूत्व केले नाही, त्यांनी आमच्याशी केले. सत्तेकडे जाणारे खूप लोक असतात पण सत्ता नसूनही लोक आमच्याकडे येत आहेत. मुंबईत लवकरच उत्तर भारतीय समाजाचा मेळावा घेऊ. 

उत्तर मुंबई भाजपचे जिल्हा सचिव प्रदीप उपाध्याय, माधवी शुक्ला, विहिंपचे घनश्याम दुबे, दिनेश यादव,  रविचंद्र उपाध्याय, दीपक दुबे, अ.भा. ब्राह्मण परिषदेचे संजय शुक्ला, बजरंग दलाचे सुरज दुबे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खा. अरविंद सावंत उपस्थित होते.

टॅग्स :उद्धव ठाकरेराम मंदिर