Join us

'बिहार निवडणुकांत फडणवीसांचं यश, जनेतचा मोदींवर विश्वास'

By महेश गलांडे | Published: November 10, 2020 2:37 PM

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने प्रभारी म्हणून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली होती. फडणवीस यांनी बिहार निवडणुकांसाठी रणनिती आखत प्रचारही केला.

ठळक मुद्देबिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने प्रभारी म्हणून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली होती. फडणवीस यांनी बिहार निवडणुकांसाठी रणनिती आखत प्रचारही केला.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासातच स्पष्ट होणार आहे. राज्यातील मजमोजणीकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. एनडीए की महागठबंधंन यांच्यात कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, भाजपाप्रणित एनडीएने आघाडी घेत विजय त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच यश आणि विजयाचे श्रेय भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने प्रभारी म्हणून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली होती. फडणवीस यांनी बिहार निवडणुकांसाठी रणनिती आखत प्रचारही केला. मात्र, निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात फडणवीस यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते मुंबईत परतले होते. मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांनी उपचार घेऊन कोरोनावर मात दिली. दरम्यानच्या, काळात निवडणूक प्रचाराची सांगता झाली. मात्र, फडणवीस यांनी आपली जबाबदारी निभावली होती. फडणवीस यांच्या रणनितीचं आणि नेतृत्वाच हे यश असल्याचं भाजपाचे नेते आणि माजी आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय. 

'बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएचा धुव्वा उडाल्याचं चित्र एक्झिट पोलमध्ये दाखवलं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात वातावरण असल्याचं दाखवलं. मात्र, बिहारमधील जनतेने भाजपवर, पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला” अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी एका मराठी वृत्त वहिनीला दिलेली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचंही हे यश आणि विजय आहे. या निवडणुकीत एनडीए 130 च्या वर जाईल आणि महागठबंधन 100 च्या खाली येईल, असा विश्वासही यावेळी प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

बिहारमध्ये प्रचंड बहुमताने बनणार एनडीए सरकार -

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी सोमवारी मतमोजणीच्या एक दिवस आधी दावा केला की, बिहारमध्ये एनडीए सरकार प्रचंड बहुमताने बनणार आहे आणि नितीशकुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतील. त्यांनी एक निवेदन जारी केले, की बिहारमधील तीन टप्प्यांच्या निवडणुका संपल्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मोठ्या संख्येने मतदारांनी एनडीएच्या बाजूने मतदान केले आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसप्रसाद लाडबिहार विधानसभा निवडणूक