Join us

"श्रावण, सोमवार, शनिवार अशा नियमांत बांधून लोकं मांसाहार करतात"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 4:04 PM

भारत विकास परिषद पश्चिम क्षेत्रातर्फे आयोजित चिंतन बैठकीच्या समारोप कार्यक्रमात ते गुरुवारी बोलत होते

मुंबई - श्रीलंकेत जोपर्यंत व्यापार होता तोपर्यंत चीन, अमेरिका, पाकिस्तान तेथे जात होते. मात्र श्रीलंकेतील संकट, मालदीवमधील पाणीटंचाई यासह विविध देशांच्या मदतीला भारत सहजपणे धावून गेला. अमेरिका, चीनसारख्या बहुतांश देशांकडून स्वार्थातूनच इतरांना मदत होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. तसेच मांसाहार न करण्याबाबतही त्यांनी भाष्य केले. तामस अन्न खाऊ नका, हिंसा करुन अन्न खाऊ नये. आपल्याकडे श्रावण, सोमवार, गुरुवा, शनिवार  यादिवशी लोकं मांसाहार करत नाहीत, असे मोहन भागवत यांनी म्हटले. 

भारत विकास परिषद पश्चिम क्षेत्रातर्फे आयोजित चिंतन बैठकीच्या समारोप कार्यक्रमात ते गुरुवारी बोलत होते. रेशीम बाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमाला सुप्रसिद्ध उद्योजक सत्यनारायण नुवाल, उमरावसिंह ओस्तवाल, विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजेंद्रसिंह संधू, चंद्रशेखर घुशे, श्याम शर्मा, सुधीर पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.  

चुकीचं अन्न खाल तर चुकीच्या मार्गावर जाल, तामस अन्न खाऊ नका. का सांगत आहे?. मोठ्या प्रमाणात हिंसा करुन अन्न खाऊ नका. मांसााहारी लोक असतात, नाही असं नाही. पश्चिमेत मांसाहारी आहेत. बाकी इतर देशांमध्ये मांस खातात, ते दररोज खातात. आपण चपाती-भाकरीसोबत भाजी खातो, पण हे लोकं मांसाहरी जेवणासोबत चपाती-भाकरी खातात, असे मोहन भागवत यांनी म्हटले. आपल्याकडे जे मांसाहारी लोक आहेत, ते संपूर्ण श्रावण महिन्यात मांसाहार करत नाहीत. मंगळवारी, सोमवारी, गुरुवारी, शनिवारीही ते मांसाहार करत नाहीत. स्वत:ला ते नियमांत बांधून घेतात आणि मांसाहार करतात, म्हणजेच ते संयमी मांसाहार करतात, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.

मानवप्राणी जेव्हा धार्मिक अनुष्ठान करतो, त्यावेळी त्याला शाकाहारी बनावंच लागतं. याला संपूर्ण जगाने मानलं आहे, पण आपल्याकडे ते आचरणात आणले जाते. त्यामुळेच, आपली बुद्धी चांगली राहिल, बुद्धी आपल्याला चांगल्या मार्गावरुन घेऊन जाईल, असेही भागवत यांनी म्हटले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी https://www.lokmat.com/ वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :मोहन भागवतनागपूर