अतिप्रदूषित शहरातील लाेकांना काेराेनाचा धाेका अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 08:18 AM2021-06-28T08:18:18+5:302021-06-28T08:18:29+5:30

करोना विषाणू पीएम२.५ सारख्या सूक्ष्म कणांना चिकटतो, असे पुरावे आहेत. त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचण्याचे माध्यम मिळून हवेतून कोविड-१९ चा प्रसार तुलनेने अधिक होतो.

The people of the highly polluted city are more worried about Kareena | अतिप्रदूषित शहरातील लाेकांना काेराेनाचा धाेका अधिक

अतिप्रदूषित शहरातील लाेकांना काेराेनाचा धाेका अधिक

Next
ठळक मुद्देधूलिकण ठरतात विषाणू प्रसाराचे माध्यम, देशातील प्रमुख शहरांच्या अभ्यासातील निष्कर्ष

निशांत वानखेडे

नागपूर : वायू प्रदूषण आणि काेरोनाचा प्रसार याचा थेट संबंध येत असल्याची बाब एका सर्वेक्षणातून सिद्ध झाली आहे. ज्या शहरात वायू प्रदूषण आणि विशेषत: धुलिकणांचे प्रदूषण अधिक त्या शहरात काेराेनाचा विषाणू वेगाने पसरण्याचा धाेका अधिक असताे. या संशोधन अहवालाने अति वायूप्रदूषण असलेल्या भागातील रहिवासी कोरोनाला बळी पडण्याची जास्त शक्यता असल्याचा पहिला पुरावा दिला आहे. २ मार्च ते नाेव्हेंबर २०२० या काळात देशातील १६ शहरांमध्ये काेराेनाबाधितांचे प्रमाण आणि राष्ट्रीय पीएम२.५ उत्सर्जनाच्या प्रमाणाचे आधारवर्ष २०१९ गृहीत धरून हे संशाेधन मांडण्यात आले. ‘एल्सवियर’ या सायन्स जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.

संशोधक चमूत यांचा समावेशडॉ. सरोजकुमार साहू, उत्कल विद्यापीठ, भुवनेश्वर पूनम मंगराज, पर्यावरणशास्त्राचा पदव्युत्तर पदवी विभाग गुफरान बेग, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च संस्थेचे संस्थापक भीष्म त्यागी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राऊरकेला व्ही. विनोज, आयआयटी, भुवनेश्वर सुवर्णा टिकले, शास्त्रज्ञ

करोना विषाणू पीएम२.५ सारख्या सूक्ष्म कणांना चिकटतो, असे पुरावे आहेत. त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचण्याचे माध्यम मिळून हवेतून कोविड-१९ चा प्रसार तुलनेने अधिक होतो.

संशोधन कशाचे?
संशोधकांनी वर्षभरातील सूक्ष्मकणांच्या (पीएम२.५) प्रदूषणाचे एकूण उत्सर्जन ‘हाय रिझोल्युशन ग्रीड’ पद्धतीने मोजले.
त्यांनी उत्सर्जनाची नवीन आकडेवारी बनवून कोरोनाबाधित आणि मृत्यूच्या आकडेवारीसह विश्लेषण केले.

मुंबई-पुणे प्रदूषित

१६ शहरांपैकी हवेच्या खराब गुणवत्ता दिवसाच्या बाबतीत मुंबई आणि पुणे अनुक्रमे 
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

वायू प्रदूषणामध्ये सूक्ष्म धूलिकण (पीएम२.५) व धूर यांचे मिश्रण हेच विषाणूसाठी पाेषक ठरतात.

अतिसूक्ष्म पीएम२.५ अनेक आठवडे हवेत राहू शकतात. पीएम२.५ व काेराेना विषाणू यांच्यात साम्य आहे.

पीएम२.५ हे उर्ध्व श्वसनसंस्थेला बाधित करणारे सूक्ष्म कण असून कोरोनाचेही आरोग्यावर तसेच परिणाम होतात.

प्रदूषणाच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी कोविड-१९ नंतर दीर्घकालीन परिणामांना सामोरे जावे लागत असल्याचे डाॅ. सराेजकुमार साहू यांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेश (४.९७ लाख) तसेच दिल्ली, गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आढळली.

निष्कर्ष दर्शवतात की पीएम२.५ उत्सर्जनाचे प्रमाण आणि कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यू यांच्याशी लक्षणीय सहसंबंध आहे.

 

Web Title: The people of the highly polluted city are more worried about Kareena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.