Join us  

मुघलांपेक्षाही भयंकर लोक सत्तेत, मुंबईत जातपात नाही हे सांगू नका - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 5:54 PM

देशात द्वेषाचे राजकारण जास्त होतेय, तेलंगणातील आमदार महाराष्ट्रात येतो आणि मुस्लिमांबद्दल वाटेल ते बोलतो. महाराष्ट्र नंपुसक सरकार आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणाले असं आव्हाडांनी सांगितले.

मुंबई - जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा, हे मुघलांपेक्षा भयंकर लोक सत्तेत आले. माणुसकी नावाचा धर्म माहिती नाही. लातूरला भूकंप झाला तेव्हा ४० दिवस शरद पवार त्या गावात जाऊन राहिले. राजकारणात माणुसकी जपायची असते. हिंदुत्व चालत नाही म्हणून सनातन धर्म काढलाय. मुंबईत जातपात नाही हे कुणी सांगू नका अशा शब्दात राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, रमाबाई कॉलनीत सर्व दलित, मुस्लीम राहतात. घाटकोपर, दक्षिण मुंबईत मासे, मटण खाता येत नाहीत. मुंबई आमच्या बापाची आहे. भंडाऱ्यांची, कोळ्यांची, आग्र्यांची, सीकेपींची आहे. त्या मुंबईत मासे खाणे गुन्हा असेल तर आम्ही तो गुन्हा करायला तयार आहोत. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. खारघरच्या दुर्घटनेत माझ्या मतदारसंघातील २ महिला मृत्युमुखी पडल्या. मुलांनी सांगितले नको जाऊ, पण महिलांनी आग्रह धरला आणि त्या गेल्या. रात्री उशीरा पनवेलच्या रुग्णालयात मृतदेह सापडला. माध्यमांनी हा विषय बाजूला ठेवत अफवा आणि वायफळ चर्चा, गॉसिपच्या बातम्या द्यायला सुरुवात केली. संध्याकाळपर्यंत वातावरण असे की काहीच घडले नाही. माध्यमांकडून अपेक्षा होती. परंतु दुर्घटनेकडे दुर्लक्ष केले असा आरोप त्यांनी केला. 

तसेच त्यादिवशी रात्री एक व्हिडिओ आला त्या स्पष्ट दिसत होते, मृत्यू उष्माघाताने नाही तर चेंगराचेंगरीमुळे झाला. जे घडलंय त्याबद्दल चौकशी नाही. सीसीटीव्ही फुटेज ठेवलेय का? नियोजन कमी कुठे पडले? लोकांना कडकडीत उन्हात बसवले. ८ तास लोकांनी काही खाल्ले नव्हते. उष्माघात अचानक येत नाही. टप्प्याटप्प्याने येतो. गर्दीतून माणसे बाहेर कशी पडली? असा सवाल आव्हाडांनी विचारला. 

दंगल कशी प्लॅन केली जाते हे अनुभवलंय देशात द्वेषाचे राजकारण जास्त होतेय, तेलंगणातील आमदार महाराष्ट्रात येतो आणि मुस्लिमांबद्दल वाटेल ते बोलतो. महाराष्ट्र नंपुसक सरकार आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणाले. रामनवमी, हनुमान जयंती संधीसाठीच झालेत की काय? कधी नव्हे तेवढे वातावरण खराब झालंय. येणारे वर्ष हे जातीय दंगलीचे असेल. राजकीय अस्थिरता कमी करू शकत नाही. नोकऱ्या देऊ शकत नाही. महागाई कमी करू शकत नाही त्यात सर्वात सोप्पं म्हणजे धार्मिक सोहळे करा, त्या सोहळ्यातून मते जमा करा आणि नाही जमले तर आग लावा. दंगली कशा प्लॅन केल्या जातात याचा मी साक्षीदार आहे. मी स्वत: उभं राहून अनुभव घेतलाय. मला दंगल कुणी समजवू नये असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

सध्या भ्रष्टाचाराला रान मोकळेमुंबई आणि MMR परिसरातील महापालिका कुठल्याही परिस्थितीत ताब्यात घेण्याचा चंग बांधलाय. ४१० किमी रस्ते एका वर्षात होऊ शकतात? मुंबईत वर्षाला ३०-४० किमी रस्ते काँक्रिट होतात. पण यांनी ४१० किमीचे टेंडर काढले. मुंबई महापालिकेचा खर्च त्यातून काढणार. पावसाळ्याच्या तोंडावर इतके मोठे टेंडर कधीच निघाले नाही. १ ऑक्टोबरपासून काम सुरू होते. आता काढलेले टेंडर सोयीसाठी होते. लोकप्रतिनिधी नाहीत त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होतो. ६ हजार कोटींचे टेंडर ४० टक्के वाढीव दराने जाते हे मुंबईच्या इतिहासात कधी घडले नाही. सोन्याचे अंडे देणारी मुंबई महापालिका आहे. ६०० कोटीचे टेंडर पूलांची रंगरंगोटी करण्यासाठी दिले. कुठलेही सौंदर्य दिसत नाही. सध्या भ्रष्टाचाराला मोकळे रान मिळाले आहे. सर्व महापालिकेत तीच परिस्थिती आहे असा आरोप आव्हाडांनी भाजपा-शिवसेना यांच्यावर केला. 

५० खोके म्हटलं तरी गुन्हा दाखल होतो महाराष्ट्राच्या खिशात किती पैसे हे सांगा, प्रत्येक कार्यक्रमात इतके कोटी देणार वैगेरे भाषा केली जाते. हजार कोटी चिल्लर वाजतात. राज्यात गद्दार नावाचा सिनेमा ८ महिन्यापासून सुरू आहे. रॅपरने ५० खोके म्हटलं म्हणून गुन्हा दाखल केला. तुम्हाला ५० खोके म्हटलं की राग का येतो? ५० खोके म्हटले की एकदम ओक्के असा आवाज येतो. ही घोषणा दिली तरी गुन्हा दाखल होतो. हा कायदा कोणता? माझ्यावर ३५४ कलम लावले असा आरोप आव्हाडांनी केला.  

टॅग्स :जितेंद्र आव्हाडभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस