मुंबई: समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर मुंबईत एकच जल्लोष झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आम्हाला समाज स्वीकारेल अशी आशा वाटते, अशा शब्दांमध्ये एलजीबीटी समुदायातील अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं कलम 377 रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बद्दल आज सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं समलैंगिकांनादेखील मूलभूत हक्क मिळवण्याचा अधिकार असल्याचं निकालात म्हटलं. आता जुनी विचारधारा बदलण्याची वेळ आल्याचंही न्यायालयानं निकालात नमूद केलं. यानंतर मुंबईतील एलजीबीटी समुदायानं जल्लोष केला. 'आतापर्यंत समाज आमच्याकडे अपराधी म्हणून पाहत होता. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर समाजाचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. समाजाकडून आम्हाला समानतेची वागणूक मिळेल, अशी आशा वाटते', अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
Section 377: समलैंगिकतेला कायद्याचं कवच, SCच्या निर्णयानंतर मुंबईत जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 12:58 PM