Join us  

Sanjay Raut: 'बारसूतील लोकांचा शिंदे-फडणवीस सरकारवर विश्वासच नाही', संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 11:00 AM

कोकणातील बारसू रिफायनरी प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

मुंबई- कोकणातील बारसू रिफायनरी प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. " बारसू संदर्भात शरद पवार यांनी स्थानिकांना विश्वासात घेण्याचा सल्ला दिला आहे, पण स्थानिकांचा या सरकारवर विश्वासच नाही, असा टोला राऊत यांनी लगावला. 

आठवडाभरात खतांच्या किमती कमी हाेणार? कृषीमंत्र्यांना अपेक्षा

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, बारसू संदर्भात खासदार शरद पवार यांनी सांगितलं स्थानिकांना विश्वासात घ्या, पण त्यांचा या सरकारवर विश्वासच नाही. काल उद्धव ठाकरे यांनीही या संदर्भात आपली भूमीका स्पष्ट केली आहे. त्यांनी ठाकरे यांच्या पत्राचा मुद्दा सांगत होते. केंद्राकडून पर्यायी जागेसाठी आग्रह होता, त्यामुळे  त्यावेळी उद्धव  ठाकरे यांनी पर्यायी जागा सुचवली आहे. पण महाविकास आघाडी सरकारने त्यावेळी जागा ताब्यात घेण्यासाठी जोरजबरदस्ती केलेली नाही, असंही राऊत म्हणाले. 

ज्या पद्धतीने कोकणातील जनता रस्त्यावर उतरली आहे,  आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. अशावेळेला हे वातावरण चिघळत ठेवण्यापेक्षा भूसंपादन मागे घ्यायला हवे, असंही राऊत म्हणाले. सर्वाच आधी ज्या राजकारण्यांनी बारसूच्या आसपास जमीनी खरेदी केली आहे, त्या सर्व परप्रांतीयांची यादी सरकारकडून अधिकृत जाहीर करावी, नाहीतर खासदार विनायक राऊत लवकरच ती यादी जाहीर करतील असा इशारा संजय राऊत यांनी दिला. 

संजय राऊत यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करत अभिनंदन केलं."नागपुरला नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल सुरू झालं. राजकारणा पलिकडील हे काम आहे यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांच अभिनंदन करतो. हे हॉस्पिटल लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे, त्या संस्थेचही मी अभिनंदन करतो, असंही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनादेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे