मुंबई- देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. भाजपला तीन तर काँग्रेसने एका राज्यात मोठा विजय मिळवला असून देशभरात भाजपने विजयी जल्लोष सुरू केला आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. या निकालावरुन आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत भाजप नेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
Video: 'देवेंद्र फडणवीसांना आनंद, पण...'; ४ राज्यातील निकालावर थोडक्यात प्रतिक्रिया
"राहुल गांधी यांची पूर्णपणे अपयशी ठरली. कर्नाटकात खोटी आश्वासन दिली होती तशीच आश्वासने त्यांनी या निवडणुकीतही दिली होती. लोकांनी आता राहुल गांधी यांची थापेबाजी ओळखली आहे, असा टोलाही भाजप नेते प्रविण दरेकर यांनी लगावला.
तेलंगणात काँग्रेसने मारली बाजी
काँग्रेसने तेलंगणात मोठा विजय मिळवला आहे, भारत राष्ट्र समितीच्या सत्तेला सुरुंग लागला असून आताच्या कलानुसार तेलंगणात ११९ पैकी काँग्रेसने ६५ जागांवर आघाडी घेतली असून भारत राष्ट्र समितीने ३९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपने ९ जागांवर आघाडी घेतली आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेस पिछाडीवर
राजस्थानमध्ये भाजपने ११३ जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेसने ७२ जागांवर आघाडी घेतली. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. पाच राज्याच्या निवडणुकीत काँग्रेस फक्त एकाच जागेवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे, तर तीन राज्यात भाजपने आघाडी घेतली आहे.