आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनता स्वीकारेल - संजय राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 03:00 PM2019-06-13T15:00:55+5:302019-06-13T15:01:47+5:30

संजय राऊत आणि अन्य शिवसेना नेतेही आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी मागणी करत आहेत

The people of state will accept Aditya Thakarene as Chief Minister - Sanjay Raut | आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनता स्वीकारेल - संजय राऊत 

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनता स्वीकारेल - संजय राऊत 

Next

मुंबई - शिवसेना नेते आदित्य ठाकरे येणाऱ्या विधानसभेत निवडणुकीला उभे राहतील अशा चर्चा सुरु असताना आता आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचा विचार शिवसेनेत सुरु आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं राज्यातील जनतेला वाटतं. एका युवा नेतृत्वाच्या हातात राज्य द्यावं असं जनतेला वाटतं असं विधान संजय राऊत यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. 

काही दिवसांपूर्वीच युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विट करत शिवसेना-भाजपाच्या युतीवर भाष्य केलं होतं. त्यावेळी भाजपा आणि शिवसेनेत सत्तेचा 50-50 फॉर्म्युला ठरला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत तसं ठरलं आहे त्यामुळे जे या बैठकीत उपस्थित नव्हते त्यांनी वेगवेगळी विधान करुन युतीत बिघाड करु नये असा टोला हाणला होता. 

संजय राऊत आणि अन्य शिवसेना नेतेही आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी मागणी करत आहेत. पक्षांतर्गत आदित्य ठाकरेंनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणं सुरक्षित राहणार आहे याचा आढावा घेण्याचं कामही सुरु आहे. युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन, निवेदन देत अनेक महाविद्यालय निवडणुकींमध्ये स्वत:चं नेतृत्व सिद्ध केलं. त्यामुळे आदित्य ठाकरेंना शिवसेना नेतेपदी बढती देण्यात आली. 

आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. अद्याप अधिकृतरित्या शिवसेनेने आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढविण्यावर कोणतंही भाष्य केलं नाही. आदित्य ठाकरे यांनीही याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असं सांगून निवडणूक लढविण्याबाबत बोलणं टाळलं. आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली तर ठाकरे घराण्यातील निवडणूक लढविणारे ते पहिलेच नेते असतील. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. संघटन वाढविण्यावर बाळासाहेबांनी भर दिला. सत्ताकाळातही बाळासाहेबांनी कोणतंही पद भूषविलं नाही. मुख्यमंत्री बसविण्याचं काम बाळासाहेबांनी केलं मात्र सत्तेचा रिमोट कंट्रोल सत्तेबाहेर राहूनही त्यांनी हातात ठेवला. सत्तेच्या खुर्चीपासून दूर राहत बाळासाहेबांनी पक्ष मजबूत करण्यावर भर दिला. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी आत्तापर्यंत कोणतंही पद स्वीकारलं नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 



 

Web Title: The people of state will accept Aditya Thakarene as Chief Minister - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.