मुंबई : आता प्रवाशांना जिन्यांवरून चढ-उतार केल्यास किती कॅलरीस् किती कमी झाल्या हे समजणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रत्येक पायरीवर कॅलरीस् विषयी नोंदी करण्यात आली आहे. यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी स्थानकावर अशी उपाययोजना राबविण्यात येणार आहे.या नोंदीवरून एक पायरी चढल्यावर प्रवासी २.० कॅलरी कमी होतील, तर त्यानंतरची पायरी चढल्यानंतर २.१ इतकी कॅलरी बर्न केल्याचे समजणार आहे. संपूर्ण जिना चढल्यास एकूण ३.०हून अधिक कॅलरीज कमी करता येणार आहे. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितले की, पश्चिम रेल्वे जिन्यांवर कॅलरीच्या नोंदी केल्याने प्रवाशांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण होणार आहे.प्रवाशांनी जिन्यांवापर करून प्रवास करणे आवश्यक आहे. रेल्वे रूळ न ओलांडता प्रवाशांनी पादचारी पुलांचा वापर करून प्रवास केला पाहिजे. स्वत:च्या आरोग्यादृष्टीने रेल्वेच्यावतीने हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिन्यांवरून चढ-उतार करताना कॅलरींची माहिती मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 11:31 PM