लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई- के पश्चिम वॉर्ड मधील प्रभाग क्रमांक ७१ चे नगरसेवक अनिष मकवानी हे गेल्या एक महिन्यापासून विलेपार्ले एस.एन.डी. टी.कॉलेजमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी येथील पालिका उपायुक्त आणि सहायक आयुक्तांकडे पाठपुरवठा करत आहेत. मात्र, अजूनही लसीकरण केंद्र सुरू झाले नाही, असे नगरसेवक मकवानी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
के पूर्व वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक ७४ मधील भाजपा नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी लसीकरण केंद्रासाठी पूनम नगरमध्ये भाड्याने जागा घेतली. मात्र, अजून येथे लसीकरण केंद्र सुरू झाले नाही अशी त्यांची तक्रार आहे. या ठिकाणी लसीकरण केंद्र लवकर सुरू करून येथील स्थानिक नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी केली आहे.
के पूर्व वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक ८४ मधील भाजपा
नगरसेवक अभिजित सामंत यांनी विलेपार्ले पूर्व येथील तेजपाल स्किम, सी.के.पी.हॉलमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र, अजूनही लसीकरण केंद्र सुरू झाले नाही, असे त्यांनी सांगितले.
---------------------------------------------