मुंबई - थकबाकीमुळे महावितरणसारखी वीज कंपनी आर्थिक अडचणीत असताना दुसरीकडे मुंबईसारख्या मायानगरीतल्या लोकप्रतिनिधींनी देखील वीज कंपन्यांची वीज बिले थकविली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन लोकप्रतिनिधींनी मुंबईतल्या एका खाजगी वीज कंपनीची वीज बिले थकविली असून, या वीज बिलांचा आकडा ५८.३२ लाख एवढा आहे. गेल्या वर्षभरातील हा थकबाकीचा आकडा असून या तीन लोकप्रतिनिधींची नावे मात्र संबंधित वीज कंपनीने सांगण्यास नकार दिला आहे.
किती थकबाकी असेल तर कापली जाते वीज?
वीज कंपन्या वीजग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी पुरेशी मुदत देतात. पहिल्या दोन महिन्यांमध्ये वीज बिल भरले नाही तर तिसरे वीज बिल पाठवताना संबंधित वीज ग्राहकाने तीन महिन्याचे बिल भरावे, अशी विनंती देखील केली जाते. सोबतच जर का वीज ग्राहकाने वीज बिल भरले नाही तर वीज प्रवाह खंडित केला जाईल, अशा आशयाची नोटीस देखील दिली जाते. यावर संबंधित वीज ग्राहकाने सहकार्य केले नाही तर मात्र नियमानुसार कारवाई केली जाते.
विजेचे दर
युनिट/बेस्ट/टाटा/अदानी/महावितरण (प्रति युनिट/रुपये )१-१००/३.१८/३.४९/४.५२/४.७११०१-३००/५.८१/६.०४/६.४७/८.६९३०१-५००/८.६५/९.४९/८.१७/११.७४५०० /१०.२१/१०.१९/९.२७/१३.२१व्यवसायिक/६.२४/६.५३/६.७४/१०.९५उद्योग/५.९३/६.१४/६.५१/६.८९
जिल्हयातील घरगुती ग्राहकटाटा - ६७९७४०अदानी - २०२७६५१बेस्ट - ७५२७९२महावितरण - ६८५७७८
वीज जोडणी खंडित करण्यापूर्वी, थकबाकी असलेल्या ग्राहकांच्या आवारात वीज जोडणी खंडित करण्याची सूचना दिली जाते. बिलिंग हा कामातला एक महत्वाचा घटक असून अचूक बिलिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य प्रयत्न करून तसेच दर महिन्याला मीटर रीडिंग करून कार्यवाही केली जाते.
थकबाकीची वसुली, ग्राहकांची अचूक बिलिंग, स्ट्रीटलाईट, पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक सेवा विभागांकडे असलेली वीजबिलांची थकबाकी तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वेग-वेगळ्या संकल्पनेतून शून्य थकबाकी करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न केले पाहिजेत यावर जोर देण्यात येत आहे.