UPSC परीक्षेत मराठी तरुणाईचा टक्का वाढला, महाराष्ट्राचं 'शतक' पार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 02:06 PM2021-09-25T14:06:58+5:302021-09-25T14:07:47+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मात्र, देशातील युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे त्यांनी ट्विटरवरुन कौतुक केलंय. विशेष म्हणजे युपीएससी टॉपर शुभम कुमार यांच्याशी थेट अमेरिकेतून फोन करुन संवाद साधला.

Percentage of Marathi youth increased in UPSC exams, Maharashtra's 'century' crossed | UPSC परीक्षेत मराठी तरुणाईचा टक्का वाढला, महाराष्ट्राचं 'शतक' पार

UPSC परीक्षेत मराठी तरुणाईचा टक्का वाढला, महाराष्ट्राचं 'शतक' पार

googlenewsNext
ठळक मुद्दे मृणाल जोशी हिने देशात ३६ वी रँक मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.

मुंबई - लोकसेवा आयोगाची युपीएससी परीक्षा २०२० चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. बिहारचा शुभम कुमार परीक्षेत पहिला आला आहे. आयआयटी मुंबईमधून त्यानं (सिविल इंजिनीयरिंग) बीटेकमध्ये पदवी घेतली आहे. तर, जागृती अवस्थी परीक्षेत दुसरी आली आहे. तिनं MANIT भोपाळमधून बीटेक (इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग) केलं आहे. यंदाच्या युपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का चांगलाच वाढल्याचे दिसून आले. तब्बल 100 हून अधिक मराठी विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत यश संपादन केलं आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण ७६१ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या पहिल्या २५ जणांमध्ये १३ विद्यार्थी आणि १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर एकूण उत्तीर्ण उमेदवारांमधील विद्यार्थ्यांची संख्या ५४५, तर विद्यार्थिनींची संख्या २१६ इतकी आहे. मृणाल जोशी हिने देशात ३६ वी रँक मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर, विनायक कारभारी नरवाडे (37), रजत रविंद्र उभयकर(49), जयंत नाहाटा (56), विनायक महामुनी (95) यांनी देशात पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवत राज्यात दोन ते 5 वा क्रमांक पटकावला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मात्र, देशातील युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे त्यांनी ट्विटरवरुन कौतुक केलंय. विशेष म्हणजे युपीएससी टॉपर शुभम कुमार यांच्याशी थेट अमेरिकेतून फोन करुन संवाद साधला. यावेळी, शुभम हे पुण्यात प्रोबेशनरी म्हणून कार्यरत आहेत. 
  
राज्यातील यशस्वी विद्यार्थी

लक्ष्य कुमार चौधरी (132), शुभम कुमार खंडेलवाल (133), रीचा कुलकर्णी (134), कमलकीशोर देशभुष खंडारकर (137), अवध सोमनाथ निवृत्त (166), अभ‍िषेक खंडेलवाल (167), गौरव रविंद्र सांळुके, पार्थ कश्यप (174), प्रतिक अशोक धुमाळ (183), आशिष गंगवार(188), रीना प्रधान (194), नितीशा संजय जगताप (199), संचित गंगवार (222), तुषार उत्तम देसाई (224), प्रथमेश अरविंद राजेशिर्के (237), साहील खरे (243), संकेत बलवंत वाघे (266), मयुर खंडेलवाल (284) प्रवीण दराडे  (312) , आकाश चौधरी (322), आनंद पाटील (325), सचिन चौबे (334), श्रीकांत विसपुते (335), साहिल संगवान (336), दिव्या गुंडे (338), सुहास गाडे (350), सागर मिसाळ (353), सुरज गुंजाळ (554), अनिल म्हस्के (361), अर्पिता ठुबे (383), सागर वाडी (385), आदित्य जिवने (399), अमोल मुरकुट (402) गोगणा गावित (422), अनिकेत फडतरे (426), श्रीराज वाणी (430), राकेश आकोलकर (432), वैभव बांगर (442), शुभम जाधव (445), अमर राऊत (449), शुभम नागरगोजे (453), ओंकार पवार (455),  अभिषेक दुधाळ (469), प्रणव ठाकरे (476),  श्रीकांत मोडक (499), यशवंत मुंडे (502), अनुजा मुसळे (511), बानकेश पवार (516), अनिकेत कुलकर्णी (517), अश्विन राठोड (520), अर्जित महाजन (521), शुभम स्वामी (523), श्रीकांत कुलकर्णी (525), शरण कांबळे (542), स्नेहल ढोके (564), सचिन लांडे (566), स्वप्निल चौधरी (572), अभिषेक गोस्वामी (574), अनिल कोटे (584), विकास पालवे (587), विशाल सारस्वत (592), मोहम्मद शाहिद खान (597) हर्षल घोगरे (614), अजिंक्य विद्यागर (617), निलेश गायकवाड (629), हेताळ पगारे (630), रविराज वडक (633), कुणाल श्रोते (640), सायली गायकवाड (641), सुलेखा जगरवार (646)  ,सुबोध मानकर (648)  ,शिवहार मोरे (649)   ,सुब्रह्मण्य केळकर (653) , सुमितकुमार धोत्रे (660), किरण चव्हाण (680), सुदर्शन सोनवणे (691), विनीत बनसोड (692), श्लोक वाईकर (699), अजय डोके (705), देवव्रत मेश्राम (713), स्वप्निल निसर्गन (714), शुभम भैसारे (727), पियुष मडके (732), शितल भगत (743), स्वरूप दीक्षित (749)
 

Web Title: Percentage of Marathi youth increased in UPSC exams, Maharashtra's 'century' crossed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.