चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी परिपूर्ण सुविधा - सुभाष देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 04:22 AM2019-12-04T04:22:00+5:302019-12-04T04:25:01+5:30
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत देसाई यांनी राज्य शासन, पोलीस, मुंबई महापालिका, बेस्ट यांनी केलेल्या तयारीसंदर्भात माहिती घेतली.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाºया अनुयायांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा मंगळवारी मंत्री सुभाष देसाई यांनी आढावा घेतला. यंदा दरवर्षीपेक्षा जास्त अनुयायी येण्याची शक्यता गृहित धरून त्याप्रमाणे नियोजन करावे, तसेच अनुयायांना देण्यात येणाºया अन्नाचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत देसाई यांनी राज्य शासन, पोलीस, मुंबई महापालिका, बेस्ट यांनी केलेल्या तयारीसंदर्भात माहिती घेतली. चैत्यभूमी, अशोक स्तंभ, भीमज्योत यासह संपूर्ण परिसराची डागडुजी व रंगरंगोटी केली आहे. नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे, तसेच दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. ६ डिसेंबरला शासकीय मानवंदना देण्यात येणार असून, हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
अनुयायांना कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारच्या वतीने शिवाजी पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्यात येईल. पाालिकेने माहिती पुस्तिकांची संख्या पन्नास हजारांवरून दीड लाख करावी, जेणेकरून सर्व अनुयायांना ती सुलभपणे मिळू शकेल, तसेच इंदू मिल येथे उभारण्यात येणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे चित्र परिसरात लावावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
विविध संस्था, संघटनांतर्फे शिवाजी पार्कवर देण्यात येणाºया अन्नाचा दर्जा चांगला असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने काळजी घ्यावी, असेही देसाई यांनी सांगितले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, आमदार भाई गिरकर, सचिन अहिर, अर्जुन डांगळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सिद्धार्थ कासारे, रवी गरूड तसेच मनोज संसारे यांच्यासह विविध विभागाचे सचिव, वरिष्ठ पोलीस, पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.