‘आपत्ती व्यवस्थापना’वर प्रदर्शन

By Admin | Published: July 21, 2014 01:27 AM2014-07-21T01:27:18+5:302014-07-21T01:27:18+5:30

आपत्ती उद्भवल्यानंतर डगमगणारी व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापनाची सद्य:स्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन नेहरू विज्ञान केंद्रात करण्यात आले आहे

Performance on 'Disaster Management' | ‘आपत्ती व्यवस्थापना’वर प्रदर्शन

‘आपत्ती व्यवस्थापना’वर प्रदर्शन

googlenewsNext

मुंबई : आपत्ती उद्भवल्यानंतर डगमगणारी व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापनाची सद्य:स्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन नेहरू विज्ञान केंद्रात करण्यात आले आहे. नॅशनल कौन्सिल आॅफ सायन्स म्युझिअमच्या वतीने ‘डिझास्टर : प्रिपेरिंग फॉर दी वर्स्ट’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृती करणे, हा उद्देश आहे.
मानवनिर्मित आपत्ती, नैसर्गिक आपत्ती आणि अकल्पित धोके असे आपत्तीचे प्रकार आहेत. या प्रदर्शनात आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रात्यक्षिक सादरीकरणही करण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे. त्यात प्रामुख्याने मानवनिर्मित आपत्तींमुळे बिघडत चाललेले संतुलन कशा प्रकारे हाताळावे, याचा उलगडा करण्यात येणार आहे.
विशेषत: हवामानातील बदलांमुळे नैसर्गिक आपत्ती आकस्मिकपणे उद्भवते. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. भूकंप, महापूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी, गारपीट या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्येच मोडणाऱ्या आहेत. या नैसर्गिक आपत्तींची कारणे, मानवी जीवनावर होणारे परिणाम, त्यावरील उपाययोजना या सर्व मुद्द्यांचा समावेश प्रदर्शनात केला आहे.
जागतिकीकरणामुळे गेल्या काही वर्षांत मानवाने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा परिणाम म्हणून मानवनिर्मित आपत्तींना तोंड द्यावे लागते आहे. या मानवनिर्मित आपत्तींमागे नेमकी कोणती कारणे आहेत, त्यांचे परिणाम, सद्य:स्थिती आणि उपाययोजना याविषयी परिपूर्ण माहिती प्रदर्शनात आहे.
नेहरू विज्ञान केंद्रात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाविषयी देशमुख यांनी अधिक माहिती दिली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मिळतील, याची ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Performance on 'Disaster Management'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.