निषेधाची काळी गुढी, २७ हजार शिक्षक व शिक्षकेतरांना वेतन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 05:23 AM2018-03-19T05:23:16+5:302018-03-19T05:23:16+5:30
वेतनाअभावी गृहकर्जाचे रखडलेले हफ्ते, चेक बाऊन्स झाल्याने बँकांनी आकारलेला दंड यामुळे मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्रस्तझाला असून या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यात घुसून रविवारी काळी गुढी उभारली.
मुंबई : वेतनाअभावी गृहकर्जाचे रखडलेले हफ्ते, चेक बाऊन्स झाल्याने बँकांनी आकारलेला दंड यामुळे मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्रस्तझाला असून या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यात घुसून रविवारी काळी गुढी उभारली.
शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी ८ वाजता परिषदेचे पदाधिकारी सुभाष अंभोरे, बी.पी. घेरडे, नरेंद्र पाठक व इतर कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद त
>तावडे यांच्या बंगल्यात घुसून बंगल्याच्या प्रवेशद्वारालाच काळी गुढी उभारून निषेध व्यक्त केला. वेतन कोणत्या बँकेत करावे या श्रेयवादाच्या लढाईत सामान्य शिक्षक भरडला जात असून दोन दिवसांत शिक्षकांना वेतन अदा न केल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अनिल बोरनारे यांनी दिला.
>२० मार्चपासून उपोषण
वेतनाबाबत सोमवारपर्यंत जर निर्णय झाला नाही तर मंगळवार, २० मार्चपासून नरेंद्र पाठक, शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यासह अन्य पदाधिकारी आझाद मैदानात उपोषण करणार आहेत.