Join us  

पर्ल्स गुंतवणूकदारांचे ‘सेबी’वर धरणे

By admin | Published: February 23, 2016 12:34 AM

पर्ल्स कंपनीच्या शेकडो गुंतवणूकादारांनी सोमवारी सेबीच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील प्रधान कार्यालयाबाहेर धरणे दिले. यावेळी अखिल भारतीय पीएसीएल (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेच्या

मुंबई : पर्ल्स कंपनीच्या शेकडो गुंतवणूकादारांनी सोमवारी सेबीच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील प्रधान कार्यालयाबाहेर धरणे दिले. यावेळी अखिल भारतीय पीएसीएल (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्य महाव्यवस्थापक रविशंकर श्रीवास्तव यांची भेट घेतली. त्यात संघटनेच्या प्रमुख मागण्या लोढा समितीकडे पाठवल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.सोमवारी संघटनेने एकूण १० हजार अर्ज मुख्य महाव्यवस्थापकांकडे जमा केले. १७ फेब्रुवारीपासून लोढा समिती कार्यरत झाली असून २५ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात होणार असल्याची माहिती श्रीवास्तव यांनी दिली. शिवाय जप्तीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर चेकद्वारे गुंतवणूकदारांची रक्कम परत देण्याची मागणीही सेबीने मान्य केली आहे, असे संघटनेचे अध्यक्ष विश्वास उटगी यांनी सांगितले.गुंतवणूकादारांना आवाहनछोट्या-मोठ्या अशा एकूण ६ कोटी गुंतवणूकदारांचे अर्ज सेबी कार्यालयात जमा करण्याचे संघटनेने ठरवले आहे. त्यासाठी संघटनेच्या जिल्हानिहाय कार्यालयांत गुंतवणूकदारांचे अर्ज स्वीकारण्यात येतील, असे संघटनेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी सांगितले.