११ कोटी ८१ लाखांच्या कामांना ‘स्थायी’ची मंजुरी

By Admin | Published: February 27, 2015 01:32 AM2015-02-27T01:32:26+5:302015-02-27T01:32:26+5:30

स्थायी समितीच्य गुरुवारी झालेल्या बैठकीत ११ कोटी ८१ लाख रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये शहरातील

'Permanent' approval for works of 11.81 crore works | ११ कोटी ८१ लाखांच्या कामांना ‘स्थायी’ची मंजुरी

११ कोटी ८१ लाखांच्या कामांना ‘स्थायी’ची मंजुरी

googlenewsNext

नवी मुंबई : स्थायी समितीच्य गुरुवारी झालेल्या बैठकीत ११ कोटी ८१ लाख रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये शहरातील काही महत्त्वपूर्ण कामांचा समावेश असून कोणतीही चर्चा न करता या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
महापालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपत आल्याने प्रलंबित कामांना मंजुरीचा सपाटा सुरू आहे, तर काही आवश्यक निर्णय घेवून नव्या कामांनाही मंजुऱ्या दिल्या जात आहेत. त्यानुसार गुरुवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत विविध आठ प्रस्तावांना मंजुरी मिळाली. मात्र कोणत्याही प्रकारची चर्चा न करता ११ कोटी ८१ लाख रुपये खर्चाच्या या कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामध्ये नेरूळ येथील श्री गणेश रामलीला मैदान विकासाच्या प्रस्तावाचाही समावेश होता. २ कोटी ४६ लाख रुपये खर्चून या मैदानाचा विकास केला जाणार आहे. गत महिन्यात झालेल्या महासभेत या मैदानाच्या वापर बदलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. तर ऐरोली सेक्टर ५ येथील २३ क्रमांकाच्या भूखंडावर दैनंदिन बाजार बांधण्याचा प्रस्तावही यावेळी मंजूर झाला. ६६० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर दैनंदिन बाजाराची ही तीन मजली इमारत उभारली जाणार आहे.
स्थानिक फेरीवाले, नागरिक यांच्या सोयीसाठी प्रशासनाने हे काम हाती घेतले आहे. त्याशिवाय कोपरखैरणे सेक्टर २३ येथील भूमिपुत्र मैदानाचा विकास देखील लवकरच होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Permanent' approval for works of 11.81 crore works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.