Join us

११ कोटी ८१ लाखांच्या कामांना ‘स्थायी’ची मंजुरी

By admin | Published: February 27, 2015 1:32 AM

स्थायी समितीच्य गुरुवारी झालेल्या बैठकीत ११ कोटी ८१ लाख रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये शहरातील

नवी मुंबई : स्थायी समितीच्य गुरुवारी झालेल्या बैठकीत ११ कोटी ८१ लाख रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये शहरातील काही महत्त्वपूर्ण कामांचा समावेश असून कोणतीही चर्चा न करता या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.महापालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपत आल्याने प्रलंबित कामांना मंजुरीचा सपाटा सुरू आहे, तर काही आवश्यक निर्णय घेवून नव्या कामांनाही मंजुऱ्या दिल्या जात आहेत. त्यानुसार गुरुवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत विविध आठ प्रस्तावांना मंजुरी मिळाली. मात्र कोणत्याही प्रकारची चर्चा न करता ११ कोटी ८१ लाख रुपये खर्चाच्या या कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामध्ये नेरूळ येथील श्री गणेश रामलीला मैदान विकासाच्या प्रस्तावाचाही समावेश होता. २ कोटी ४६ लाख रुपये खर्चून या मैदानाचा विकास केला जाणार आहे. गत महिन्यात झालेल्या महासभेत या मैदानाच्या वापर बदलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. तर ऐरोली सेक्टर ५ येथील २३ क्रमांकाच्या भूखंडावर दैनंदिन बाजार बांधण्याचा प्रस्तावही यावेळी मंजूर झाला. ६६० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर दैनंदिन बाजाराची ही तीन मजली इमारत उभारली जाणार आहे. स्थानिक फेरीवाले, नागरिक यांच्या सोयीसाठी प्रशासनाने हे काम हाती घेतले आहे. त्याशिवाय कोपरखैरणे सेक्टर २३ येथील भूमिपुत्र मैदानाचा विकास देखील लवकरच होणार आहे. (प्रतिनिधी)