Join us

विनापरवाना ३०५ रिक्षांना कायमचा ब्रेक

By admin | Published: November 07, 2015 2:40 AM

ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि वसई परिसरात विनापरवाना धावणाऱ्या रिक्षांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील ३५ दिवसांमध्ये

-  पंकज रोडेकर,  ठाणे

ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि वसई परिसरात विनापरवाना धावणाऱ्या रिक्षांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील ३५ दिवसांमध्ये विनापरवाना रस्त्यांवर धावणाऱ्या ३०५ रिक्षांना कायमचा ब्रेक लावला आहे. यात सर्वाधिक १९० रिक्षा ठाणे विभागात जप्त केल्या आहेत. या कारवाईत साडेआठ लाखांचा दंडही वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईसाठी विशेष सहा वायुवेग पथके तैनात केली होती.अवैधरीत्या धावणाऱ्या रिक्षांविरोधात आरटीओने १ आॅक्टोबरपासून कारवाईला सुरुवात केली आहे. याचदरम्यान १ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर एकूण ६ हजार ९१८ रिक्षांची तपासणी केली. त्यामध्ये दोन रिक्षांचे परवाने मुदतबाह्णझाल्याचे समोर आहे. तर ९० खाजगी तर १ हजार १६२ इतर अशा १ हजार २४७ रिक्षा दोषी आढळल्या आहेत. त्यामध्ये ३०५ रिक्षा जप्त केल्या आहेत. तर, ४६३ रिक्षा प्रकरणे निकाली काढून त्यांच्याकडून ८ लाख ३४ हजार ७२५ रुपये दंड वसूल केला आहे. यात नवी मुंबईतून १४२८ रुपयांचा विशेषकर वसूल केला आहे. ठाण्यातील मुंब्रा, कळवा आणि भिवंडी परिसरात विनापरवाना मोठ्या प्रमाणात रिक्षा धावत असल्याची माहिती आरटीओला मिळाली होती. त्यानुसार, ठाणे विभागाने तपासलेल्या ४ हजार ४२८ रिक्षांपैकी ६४२ रिक्षा दोषी ठरवून त्यापैकी १९० रिक्षा जप्त केल्या आहेत. तर निकाली काढलेल्या ३२७ प्रकरणांत ४ लाख २७ हजार २७५ रुपयांचा दंड आकारला आहे.विनापरवाना रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांविरोधात आरटीओने कारवाई हाती घेतल्याचे समजताच रिक्षाचालक पसार होतात. त्यामुळे यंदा खाजगी वाहनांची नवीन युक्ती लढवून कारवाईला सुरुवात केली आहे. तसेच या रिक्षांबाबत आता नागरिकांकडून माहिती मिळू लागली आहे.- विकास पांडकर, आरटीओ अधिकारी, ठाणे आरटीओ कारवाईचा तक्ता विभाग तपासलेली दोषीजप्तदंडवाहनेवाहनेवाहनेवसुलीठाणे४,४२८६४२१९० ४,२७,२७५कल्याण१,१३५२१७१२ २,१३ ६००नवी मुंबई४७८९७२८६१,८२८वसई८७७२९१७५१,३३,४५०एकूण६,९१८१,१६२३०५८,३६,१५३