नवी मुंबई: बाहेरगावी जाणा:या खासगी लक्झरी बसेसना सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथील जुन्या टोल नाक्याजवळ कायम स्वरूपी थांबा देण्याची मागणी अखिल भारतीय प्रवासी सेवा संघाने केली आहे. यासंदर्भात सोमवारी उपप्रादेशिक परिवहन अधिका:यांची भेट घेणार असल्याचे संघाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. या शहरात विविध प्रांताचे लोक राहतात. त्यामुळे बाहेरगावी जाणा:या खासगी लक्झरी बसेसना नवी मुंबईतील प्रवाशांची चांगली मागणी आहे. दररोज हजारो प्रवासी या गाडय़ांनी प्रवास करतात. परंतु या गाडय़ांसाठी शहरात योग्य थांबे नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पूर्वी सायन-पनवेल महामार्गावर वाशी सिग्नलजवळील एसटी थांब्यावर या गाडय़ा थांबायच्या.
परंतु आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी वाहतूकीला अडथळा निर्माण होत असल्याचे कारण पुढे करून या गाडय़ांना येथे थांबण्यास मज्जाव करण्यात आला होता. तेव्हापासून मुंबईहून सुटणा:या काही गाडय़ा जुना टोलनाका येथे तर
काही पुन्हा वाशी सिग्नलजवळ थांबविल्या जात आहेत. बाहेरगावी जाणा:या गाडय़ांना स्वतंत्र थांबा नसल्याने प्रवाशांची धावपळ होत आहे. प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी जुन्या टोलनाक्याजवळ कायमस्वरूपी थांबा द्यावा, अशी मागणी प्रवासी सेवा संघातर्फे करण्यात आली आहे.
पूर्वी जुन्या टोल नाक्याजवळ प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचा ठरला होता. उभे राहण्यासाठी कोणतेही शेड,पिण्याच्या पाण्याची सुविधा व प्रसाधनगृहाची सोय नसल्याने येथे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. तसेच हे ठिकाण वसाहतीपासून अंतरावर असल्याने तेथर्पयत जाण्यासाठी किंवा तिकडून येण्यासाठी रिक्षा अथवा खासगी वाहनांचा वापर करावा लागत असे.
मात्र सध्या सायन-पनवेल मार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. याअंतर्गत वाशी गाव येथील भुयारीमार्गापासून वाशी सेक्टर 1 र्पयत महामार्गाला समांतर असा छोटा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना जुन्या टोल नाक्यार्पयत ये-जा करणो सोयीचे होणार आहे. तसेच रिक्षा व खासगी वाहनांनाही येथपयर्ंत पोहचणो सोपे होणार आहे. यासंदर्भात प्रवासी सेवा संघाच्या वतीने
सोमवारी आरटीओ अधिका:यांची भेट घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सध्या सायन-पनवेल मार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. याअंतर्गत वाशी गाव येथील भुयारीमार्गापासून वाशी सेक्टर 1 र्पयत महामार्गाला समांतर असा छोटा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना जुन्या टोल नाक्यार्पयत ये-जा करणो सोयीचे होणार आहे. तसेच रिक्षा व खासगी वाहनांनाही येथपर्यंत पोहचणो सोपे होणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सोयीसुविधांसह या ठिकाणी बाहेर गावी जाणा:या गाडय़ाना कायमस्वरूपी थांबा द्यावा, अशी मागणी प्रवासी संघांचे सरचिटणीस तथा कामगार नेते प्रफुल्ल म्हात्रे यांनी केली आहे.