खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रे २४ तास सुरु ठेवण्याची परवानगी, आतापर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ जणांना देण्यात आली लस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 09:35 PM2021-03-10T21:35:46+5:302021-03-10T22:02:25+5:30

मुंबईत १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत एक लाख ३६ हजार ४९१ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Permission to continue vaccination centers in private hospitals for 24 hours | खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रे २४ तास सुरु ठेवण्याची परवानगी, आतापर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ जणांना देण्यात आली लस

खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रे २४ तास सुरु ठेवण्याची परवानगी, आतापर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ जणांना देण्यात आली लस

Next


मुंबई- कोरोनाची (CoronaVirus) लागण होण्याचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना असतो. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग मिळावा, यासाठी खाजगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रे (vaccination centers) आठवड्याचे सातही दिवस २४ तास सुरु ठेवण्याची परवानगी महापालिका देणार आहे. त्यानुसार दररोज एक लाख व्यक्तींचे लसीकरण झाल्यास महिन्याभरात मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. (Permission to continue vaccination centers in private hospitals for 24 hours)

मुंबईत १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत एक लाख ३६ हजार ४९१ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या १५ हजार २७२ नागिरकांना लस देण्यात आली आहे. सध्या सुरु असणारी केंद्रे ही आठ ते १२ तास या कालावधीसाठी कार्यरत आहेत. त्यामुळे लसीकरण वाढविण्याबाबत पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी बुधवारी विशेष आढावा व नियोजन बैठक बोलावली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी, आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

खासगी रुग्णालयांना आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे २४ तास लसीकरण सुरु ठेवण्याच्या महानगरपालिकेच्या प्रस्तावास केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली. याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. अनेक खासगी रुग्णालयांनी २४ तास कार्यरत राहणारे लसीकरण केंद्र सुरू करण्यात स्वारस्य दाखविले. ही लसीकरण केंद्रे २४ तास कार्यरत झाल्यास दररोज एक लाख नागरिकांचे लसीकरण करणे शक्य होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आणखी २९ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

Web Title: Permission to continue vaccination centers in private hospitals for 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.