मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज १०० देशांतर्गत विमानांची वाहतूक करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे मंगळवारपासून विमानतळावर ५० विमानांचे आगमन व ५० विमानांचे उड्डाण होईल.सध्या मुंबई विमानतळावरून दररोज ५० विमानांची वाहतूक केली जात आहे. त्यामध्ये विमानतळावर येणाऱ्या २५ विमानांचा व विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या २५ विमानांचा समावेश आहे. ही संख्या दुप्पट केल्याने विमान प्रवाशांना दिलासा मिळेल. मुंबईतून देशाच्या विविध पंधरा सेक्टरमध्ये सध्या देशांतर्गत हवाई प्रवास सुरू असून, लवकरच त्यामध्येही वाढ करण्यात येणार असल्याचे समजते.
मुंबई विमानतळावरून आजपासून १०० विमानांच्या वाहतुकीला परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 4:44 AM