बांधकाम नकाशे मंजूर नसतांना वृक्षतोडीला परवानगी
By admin | Published: May 26, 2015 10:54 PM2015-05-26T22:54:14+5:302015-05-26T22:54:14+5:30
आता बाळकुम भागातील मे. पिरामल इस्टेट प्रा. लि. च्या बांधकामात बाधीत होणाऱ्या वृक्षांचे आणखी प्रकरण समोर आले आहे.
ठाणे : कोलशेत येथील क्लेरिअंट कंपनीच्या आवारात पाच हजार वृक्ष तोडीचे प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात अडकले असतांना आता बाळकुम भागातील मे. पिरामल इस्टेट प्रा. लि. च्या बांधकामात बाधीत होणाऱ्या वृक्षांचे आणखी प्रकरण समोर आले आहे. येथील बांधकामाचे नकाशे मंजूर नसतांना उद्यान विभागाने वृक्ष तोडीला परवानगी दिल्याची माहिती उघड झाली आहे.
विशेष म्हणजे, वृक्ष गणना
झाली त्यावेळेस या भागात
५९८२ वृक्ष प्रत्यक्षात अस्तित्वात होते. परंतु, आता त्याच ठिकाणी ५००९ वृक्ष असल्याने उर्वरित ९७३ वृक्ष गेले कुठे असा सवाल पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
या संदर्भात आता ठाण्यातील दक्ष नागरिक चंद्रहास तावडे यांनी महापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण समितीकडे लेखी तक्रारीद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाइची मागणी केली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीत येथील ११९ झाडे तोडणे व १०६ झाडे लावण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, प्रत्यक्षात उद्यान विभागाने वृक्ष प्राधिकरण समितीच्याही डोळ्यात धुळफेक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
४या विषयानुसार कंपनीने सादर केलेल्या अर्जासोबत या भूखंडावर एकूण वृक्षांची संख्या किती आहे, याची माहिती सादर केलेली नाही.
४विशेष म्हणजे त्यांनी जोडलेल्या आकडेवारीनुसार येथे ५००९ वृक्ष दाखविण्यात आले आहेत.
४प्रत्यक्षात २०११ मध्ये झालेल्या वृक्ष गणनेत याठिकाणी ५९८२ वृक्ष होते. त्यामुळे उर्वरित ९७३ वृक्ष गेले कुठे असा सवाल तावेडेंनी केला आहे.
या विषयाच्या हरकती मागविणारी जाहीर सूचना वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये हकरती दाखल करण्यासाठी ७ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. परंतु, सात दिवस पूर्ण होण्याआधीच हा विषय निर्णयार्थ विषय पत्रिकेवर घेण्यात आला.
वृक्षप्राधिकरण समितीस संबंधित माजिवडा
1मानपाडा प्रभाग समितीच्या उद्यान तपासनीसांनी त्यांचा पाहणी अहवाल सादर केला होता. परंतु त्या अहवालावर प्रभारी वृक्ष अधिकारी दिनेश गावडे यांनी तपासून स्वाक्षरी केलेली नसून, त्यास उपायुक्त, उद्यान वृक्ष प्राधिकरण विभाग यांची तसेच अतिरिक्त आयुक्त, वृक्षप्राधिकरण विभाग व आयुक्तांची मान्यता घेतलेली नाही. त्यांच्या मान्यतेशिवाय उद्यान तपासणींचा अहवाल थेट वृक्ष प्राधिकरण समितीस सादर केल्याचा आरोप त्यांनी केला.
2हा प्रस्ताव सादर करताना नियमानुसार विकास प्रस्तावअंतर्गत आवश्यक बांधकाम नकाशे मंजूर असणे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणी बांधकाम नकाशे मंजूर झालेले नसल्याची माहिती शहर विकास विभागाने १८ मे २०१५ रोजी दिल्याची माहिती त्यांनी दिली.
3एकूणच बांधकाम नकाशे मंजूर नसताना घाईघाईने वृक्षतोडीचा प्रस्ताव पाहणी अहवालासहीत प्रशासकीय त्रुटींसह वृक्षप्राधिकरण समितीस सादर करण्यात आला आहे. त्याला २४ एप्रिल रोजी मंजुरी दिलेली आहे. तसेच या प्रकरणा संदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
माझी प्रकृती ठिक नसल्याने मागील एक महिन्यापासून मी रजेवर आहे. त्यामुळे माझ्या खालच्या अधिकाऱ्यांनी काही केले असेल तर याची मला कल्पना नाही.
- दिनेश गावडे, प्रभारी वृक्ष अधिकारी-ठामपा