तरुणीला पाहून अश्लील कृत्य करणारा परप्रांतीय गजाआड, ४८ तासांच्या आत आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 06:01 AM2017-10-24T06:01:37+5:302017-10-24T06:01:39+5:30

मुंबई : चालत्या लोकलमध्ये तरुणीला पाहून अश्लील कृत्य करणा-या परप्रांतीय तरुणाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Perpetrator junking, who is seen to be mistreated by the woman, is accused in 48 hours | तरुणीला पाहून अश्लील कृत्य करणारा परप्रांतीय गजाआड, ४८ तासांच्या आत आरोपी अटकेत

तरुणीला पाहून अश्लील कृत्य करणारा परप्रांतीय गजाआड, ४८ तासांच्या आत आरोपी अटकेत

Next

मुंबई : चालत्या लोकलमध्ये तरुणीला पाहून अश्लील कृत्य करणा-या परप्रांतीय तरुणाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हार्बर मार्गावरील सीएसएमटी-बेलापूर लोकलमध्ये शनिवारी हा प्रकार घडला. कृपा भादेबो पटेल (३०) असे या तरुणाचे नाव आहे. मूळचा ओरिसा येथे राहणारा कृपा सध्या मशीद बंदर येथील फुटपाथवर वास्तव्यास होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मूळचा ओरिसा येथील कंटाबाबजी तालुक्यातील असणारा कृपा बेरोजगार असल्याचे पोलीस चौकशीत दिसून आले. दिवसभर मोलमजुरी करून रात्री मशीद बंदर येथील गुलशन इराणी हॉटेलसमोरील फुटपाथवर वास्तव्यास होता. सीएसएमटी स्थानकातून हार्बर फलाट क्रमांक १वरून बेलापूरला जाणारी लोकल निघाली.
लोकलच्या मिडल महिला डब्यातून तरुणी प्रवास करत होती. मध्य महिला डब्यालगत असलेल्या दिव्यांग डब्यातील जाळीलगत उभा राहून कृपा पटेल या आरोपीने तरुणीकडे पाहून
अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. सीएसएमटी ते मशीद स्थानकादरम्यान हा प्रकार घडला. सकाळी ही घटना घडल्यामुळे दिवसादेखील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घाबरलेल्या तरुणीने सीएसएमटी रेल्वे स्थानकात तक्रार दाखल करताच रेल्वे पोलिसांनी आरोपीची शोध मोहीम सुरू केली. तरुणीने सांगितलेल्या वर्णनानुसार आरोपीचा शोध घेण्यासाठी हार्बरसह मध्य आणि पश्चिम मार्गावर पथके रवाना केली.
तसेच स्थानकातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करण्यात आली. सोमवारी सकाळी ६ वाजता आरोपी सीएसएमटी स्थानकातील धन्यवाद गेटजवळ येणार असल्याची माहिती पोलीस उप निरीक्षक भद्रशेट्टे यांना मिळाली. यानुसार सापळा रचून रेल्वे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
तरुणीने तक्रार दाखल करताच विशेष पथकाने ४८ तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड आणि सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांच्या देखरेखीखाली विशेष पथक नेमण्यात आले होते.
यात वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे, निरीक्षक विलास चौगुले, उपनिरीक्षक भद्रशेट्टे आणि घोरपडे स.पो.नि. गावकर यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली. हवालदार निकम आणि शिपाई सानप व पाटील यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title: Perpetrator junking, who is seen to be mistreated by the woman, is accused in 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.