लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थ विक्रेत्याचे नाव उघड केल्याच्या रागात मालवणीत एका कुटुंबावर काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला होता.
सात महिन्यांपूर्वी घडलेल्या या हल्ल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्याचे आदेश वरिष्ठांकडून मालवणी पोलिसांना देण्यात आले आहेत.
मालवणीच्या गेट क्रमांक ६ येथे भीमनगर परिसरात राहणाऱ्या एन डोंगरे कुटुंबाला तृतीयपंथी आणि महिलांच्या एका गटाने घरात घुसून मारहाण केली. तक्रारदार सोडविण्यास गेले तेव्हा त्यांनाही शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. अमली पदार्थ विक्रेत्यांचे नाव उघड केल्याच्या रागात ही मारहाण करण्यात आल्याचे डोंगरे यांचे म्हणणे होते. याबाबत त्यांनी सतत पोलिसांसोबत पत्रव्यवहार सुरू ठेवला आणि अखेर पोलीस उपायुक्त परमवीर सिंग यांनाही याबाबत लेखी तक्रार केली होती.
त्यानुसार मालवणी सहायक आयुक्त दिलीप यादव यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले.