मुंबई : सुनील लाहोरिया हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने नवी मुंबईच्या एका केबलचालकाची आरोपमुक्तता केली. त्याच्याविरुद्ध खटला चालवायला पुरेसे पुरावे नसल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने त्याला दिलासा दिला.नवी मुंबईत केबलचा व्यवसाय असलेल्या भूपेश गुप्ता याची गेल्या आठवड्यात न्या. ए. एम. बदर यांनी लाहोरिया हत्या प्रकरणातून आरोपमुक्तता केली. पोलिसांनी दाखल केलेल दोषारोपपत्र आणि साक्षीदारांच्या जबाबावरून गुप्ताची या हत्येप्रकरणातील भूमिका स्पष्ट होत नाही, असे न्या. बदर यांनी म्हटले.गुप्ता याने जुलैमध्ये सत्र न्यायालयात आरोपमुक्तता करण्यासंदर्भात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला. सरकारी वकिलांनी या हत्येप्रकरणी आपल्या भूमिकेविषयी सांगितले आहे, अगदी तशीच भूमिका या हत्येप्रकरणात आरोपी सुमीत बचेवार याचीही आहे. मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तसेच मी केबलच्या व्यवसायात असून त्याचा लाहोरियाशी काहीही संबंध नाही, असे गुप्ता याने अर्जात म्हटले होते. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, या केसमधील मुख्य आरोपी सुरेश बिजलानी याच्याशी गुप्ताचे चांगले संबंध होते. बिजलानीने बांधलेल्या इमारतींना गुप्ता केबल जोडायचा.फेब्रुवारी २०१३मध्ये सुनील लाहोरिया यांची त्याच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी १४ लोकांना अटक करण्यात आली. आयपीसीच्या वेगवगेळ्या कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले.पुरावे नाहीतकोणत्याही साक्षीदाराचा जबाब गुप्ताचा या हत्येप्रकरणात असलेली भूमिका स्पष्ट करत नाही. जबाब तसेच उपलब्ध पुराव्यांवरून गुप्ता मध्येच बिजलानीच्या कार्यालयाला भेट द्यायचा. आरोपीला भेटणारा कारस्थानी ठरत नाही. हत्येच्या आधी किंवा नंतर गुप्ताने बिजलानीशी संपर्क केला, हे सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नाहीत; तसेच दोषारोपपत्रातही त्याच्याविरुद्ध काही पुरावे नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
‘त्या’ केबलचालकाची आरोपातून सुटका, उच्च न्यायालय, सुनील लाहोरिया हत्या प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 4:50 AM