पेसा अ‍ॅक्टची अंमलबजावणी करणार!

By admin | Published: September 10, 2014 12:07 AM2014-09-10T00:07:38+5:302014-09-10T01:02:23+5:30

पेसा कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्या संदर्भातील नियम बनवण्यासाठी अठरा वर्षाचा कालावधी लागला असला तरी या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी अधिकारीवर्ग तत्पर राहील

PESA will implement the act! | पेसा अ‍ॅक्टची अंमलबजावणी करणार!

पेसा अ‍ॅक्टची अंमलबजावणी करणार!

Next

डहाणू : पेसा कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्या संदर्भातील नियम बनवण्यासाठी अठरा वर्षाचा कालावधी लागला असला तरी या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी अधिकारीवर्ग तत्पर राहील अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डहाणू येथे दिली.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आज आदिवासी बहुल असलेल्या डहाणू तालुक्यातील शिक्षण, आरोग्य, वनहक्क कायद्यासंदर्भात पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत खा. चिंतामण वनगा, राज्यमंत्री राजेंद्र गावित, विभागीय कोकण आयुक्त राधेश्याम मोकलवार, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सुर्यवंशी,पोलीस अधिक्षक मंहमद हकक, आदी मान्यवर आणि शेकडो प्रशासकीय वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सर्वप्रथम राज्यपाल सी. विद्यासागर राव सौराष्ट्र एक्सप्रेसने डहाणू रेल्वेस्थानकात उतरले. त्यानंतर ते विश्रामगृह (डहाणू) येथे आले. त्यानंतर राज्यपालानी आशागड येथील जीवनधारा कन्याशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच अंगणवाडी येथे भेट देऊन तेथील माहिती घेतली.
शिवाय आशागड येथील प्रसिद्ध संतोषीमाता मंदिराच्या आवारात राज्यपालांनी वनहक्क पट्टेधारकांच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते वनहक्क पट्टेधारकांना त्यांच्या नावाचा सातबारा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.
दरम्यान राज्यपाल विद्यासागर यांनी यावेळी आदिवासी समाजाचे जीवनमान उंचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: PESA will implement the act!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.