Join us  

वर्सोवा येथे यंदा पेशव्यांचा वाडा

By admin | Published: October 06, 2016 4:03 AM

सर्वधर्मीयांचा नवरारात्रौत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्सोवा, यारी रोड येथील नवरात्रौत्सवात यंदा ४० फुटी पेशव्यांच्या वाड्याचा भव्य देखावा श्री गणेश साई मंदिर दुर्गापूजा समितीने उभारला आहे

मुंबई : सर्वधर्मीयांचा नवरारात्रौत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्सोवा, यारी रोड येथील नवरात्रौत्सवात यंदा ४० फुटी पेशव्यांच्या वाड्याचा भव्य देखावा श्री गणेश साई मंदिर दुर्गापूजा समितीने उभारला आहे. हा देखावा आणि सिंहावर आरूढ झालेली १० फुटी दुर्गामातेची भव्य मूर्ती बघण्यासाठी वेसावेकरांसह उपनगर आणि नवी मुंबई, वसई विरार येथील नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. यंदा नवरात्रौत्सवाचे ३१ वे वर्ष आहे. दुर्गामातेची घटस्थापना प्रसिद्ध विकासक के. एन. पिंपळे यांनी केली. या वेळी समितीचे सर्वेसर्वा विकास पाटील, अध्यक्ष कमलाकर पाटील, तसेच विवेक पाटील, अजित पाटील, अमित पार्धी, आनंद नाईक, उदय शाह आदी समितीचे सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते.प्रसिद्ध कलादिग्दर्शक चंद्रवर्धन मोरे यांनी हा ४० फुटी पेशव्यांच्या वाड्याचा भव्य देखावा साकारला असून दुर्गामातेची सिंहावर आरूढ झालेली १० फुटी सुंदर मूर्ती मालाड येथील प्रसिद्ध मूर्तिकार पांडुरंग राठोड यांनी घडवली आहे.येथील समितीच्या जागृत गणेश साई मंदिरात गणपती, साईबाबा आणि दुर्गामातेच्या सुंदर मूर्ती असून दर्शन घेण्यासाठी दर मंगळवार आणि गुरुवारी येथील मंदिरात भविकांची गर्दी असते. मंदिराच्या परिसरात भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षी विकास पाटील येथे रामनवमीला भंडारा आयोजित करतात. या वेळी भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होतात. गणेश-साई मंदिरासमोर मदिना मशीद आहे. येथील सर्वधर्मीय नागरिक नवरात्रौत्सवात मोठ्या उत्साहाने आणि गुण्या-गोविंदाने सहभागी होतात, अशी माहिती विकास पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)