बीकेसीमध्ये एमएमआरडीएकडून प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत जंतूनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:01 PM2020-04-11T19:01:21+5:302020-04-11T19:01:53+5:30

वांद्रे- कुर्ला संकुलामध्ये (बीकेसी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत जंतूनाशकांची फवारणी करण्यास सुरूवात करण्यात आली.

Pesticide spraying under the preventive measures by MMRDA in BKC | बीकेसीमध्ये एमएमआरडीएकडून प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत जंतूनाशक फवारणी

बीकेसीमध्ये एमएमआरडीएकडून प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत जंतूनाशक फवारणी

Next

मुंबई : वांद्रे- कुर्ला संकुलामध्ये (बीकेसी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत जंतूनाशकांची फवारणी करण्यास सुरूवात करण्यात आली. यासह एमएमआरडीए कार्यालय आणि परिसरामध्येही ही फवारणी करण्यात येत असल्याचे एमएमआरडीएमार्फत स्पष्ट करण्यात आले. 

      कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यभरात आता संचारबंदी आणि जमावबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे स्वच्छतेला प्राधान्य देत एमएमआरडीएने दोन जंतूनाशक मशिनच्या सहाय्याने कोरोना प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत बीकेसी परिसरात जंतूनाशक फवारणी सुरू केली आहे.

      एमएमआरडीएमार्फत नव्याने स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. अनेक स्वच्छतादूत यामध्ये परिश्रम घेत आहेत. शनिवारी एमएमआरडीएच्यावतीने बीकेसीतील एमएमआरडीएचे जुने आणि नवीन कार्यालय आहे. तसेच सभोवतालचे सर्व रस्ते आणि कार्यालयात जंतूनाशक फवारणी केली. त्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याचा धोका टळला आहे. नुकतेच कलानगर येथील चहावाल्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला होता. तसेच हा परिसर पालिकेने रेड स्पाॅट म्हणून घोषित केला होता. कला नगर आणि बीकेसी एमएमआरडीएचे कार्यालय हे अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे प्रतिबंधक उपाय म्हणून ही फवारणी करण्यात आली असल्याचे एमएमआरडीएमार्फत स्पष्ट करण्यात आले.

      यूनाइटेड फोस्फरस लिमिटेड या कंपनीने सदर मशीन एमएमआरडीएला दिले असल्याचे समजते. या मशिनच्या देखभालीची जबाबदारी ही एमएमआरडीएकडे असणार आहे. युपीएलकडून या मशीन एमएमआरडीएला मोफत पुरविण्यात आल्या आहेत. एमएमआरडीएने यापूर्वी आपल्या सर्व अकरा हजार कामगारांच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांना सॅनिटायजर सोबत मास्क देखील पुरविल आहेत. तसेच लेबर कॅम्पमध्ये त्यांना अन्नधान्य पुरविण्याची जबाबदारी देखील एमएमआरडीएने घेतली आहे. 

Web Title: Pesticide spraying under the preventive measures by MMRDA in BKC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.