Join us  

हत्येच्या कटाविषयी पीटरला सांगितले होते

By admin | Published: January 17, 2016 2:53 AM

शीना बोरा हत्येतील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने शीनाच्या हत्येच्या कटाविषयीची माहिती तिचा पती पीटर मुखर्जीला दिली होती, अशी माहिती शनिवारी सीबीआयने विशेष सीबीआय

मुंबई : शीना बोरा हत्येतील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने शीनाच्या हत्येच्या कटाविषयीची माहिती तिचा पती पीटर मुखर्जीला दिली होती, अशी माहिती शनिवारी सीबीआयने विशेष सीबीआय न्यायालयाला दिली. पीटर मुखर्जी ब्रिटनचा नागरिक असल्याने त्याची जामिनावर सुटका करण्यात आली तर तो ब्रिटनचा आश्रय घेण्याची शक्यता आहे, असे म्हणत सीबीआयने पीटरच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी ३० जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे.पीटरसंबंधी विचारणा करण्यासाठी पुन्हा एकदा इंद्राणीची चौकशी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती सीबीआयने न्यायालयाला केली होती. गुरुवारी न्यायालयाने सीबीआयला तशी परवानगीही दिली. या चौकशीमध्येच पीटरला या हत्येच्या कटाविषयी कल्पना असल्याचे उघडकीस आले. आता अन्य दोन व्यक्तींची चौकशी करणे बाकी आहे आणि त्यांना पीटरसमोर आणायचे आहे, अशी माहिती सीबीआयने न्यायालयाला दिली. न्या. एच.एस. महाजन यांनी सीबीआयचा युक्तिवाद ग्राह्य धरत या अर्जावरील पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी ठेवली.पीटरवर आरोपपत्र दाखल केले नसल्याने त्याची केस विशेष सीबीआय न्यायालयात वर्ग करण्यात आली नाही. मात्र इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, ती केस विशेष सीबीआय न्यायालयात वर्ग केली आहे.