Join us  

धोका असल्याचे पीटरला सांगितले होते

By admin | Published: February 22, 2016 1:25 AM

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडप्रकरणी सीबीआयने आपल्या पुरवणी आरोपपत्रात मोठे खुलासे केले आहेत. शीनाची हत्या होण्याच्या सुमारे वर्षभरापूर्वीच तिचा प्रियकर राहुल मुखर्जी

नवी दिल्ली : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडप्रकरणी सीबीआयने आपल्या पुरवणी आरोपपत्रात मोठे खुलासे केले आहेत. शीनाची हत्या होण्याच्या सुमारे वर्षभरापूर्वीच तिचा प्रियकर राहुल मुखर्जी याने आपल्या वडिलांना म्हणजेच पीटर मुखर्जी याला एक ईमेल केला होता. शीनाच्याच नव्हे, तर आपल्याही जिवाला इंद्राणीकडून धोका असल्याचे राहुलने त्यात म्हटले होते. सीबीआयने आपल्या पुरवणी आरोपपत्रात ही चर्चा सामील केली आहे. आपली पत्नी इंद्राणी ही राहुल आणि शीनाला धमकी देत असल्याचे पीटरला माहीत होते. इंद्राणीच्या धमक्यांचे ई-मेल, मेसेज व दस्तावेज सुरक्षित ठेवण्यासाठी शीना आणि राहुलने बॅकअप ठेवले होते. १३ एप्रिल २०११ रोजी राहुलने पीटरला एक ईमेल पाठवला होता. यात त्याने इंद्राणीकडून आपल्याला सतत धमक्या दिल्या जात असल्याचे म्हटले होते.‘इंद्राणीकडून मला सतत धमक्या देण्यात येत आहेत. त्यासंदर्भातले ईमेल, फोनवरचे संभाषण आणि मेसेज मी सुरक्षित ठेवले आहेत. शीना वा मला काहीही झाल्यास ते सार्वजनिक केले जातील, असे या ईमेलमध्ये राहुल म्हणाला होता.पीटरही सक्रिय सामीलपीटर मुखर्जी हाही शीना हत्याकांडाच्या कटात सक्रियपणे सामील आहे, असा आरोप सीबीआयने आरोपपत्रात ठेवला आहे. आपले वडील शीनाला ईमेल पाठवण्यासाठी इंद्राणी व खन्नाची मुलगी विधी हिच्या ईमेल अकाउंटचा वापर करत आहे, असा खुद्द राहुलला संशय होता. त्याने ईमेलमध्ये तसा स्पष्ट आरोप केला होता. तुम्ही स्वत: विधीच्या ईमेल अकाउंटवरून ईमेल पाठवून आणि जेव्हा शीनाला इंद्राणीकडून स्पष्टीकरण हवे होते तेव्हा विधीच्या हाती फोन थोपवून तिला या सगळ्यात सामील करून घेतले, असे राहुलने पीटर मुखर्जीला उद्देशून लिहिले होते. तुमच्या पत्नीने मला धमक्या दिल्या, प्रगती रोखण्याचे प्रयत्न केले,मला फ्लॅटमधून काढण्याचे प्रयत्न केले, असेही राहुलने ईमेलमध्येलिहिले होते. पीटरला १९ नोव्हेंबर २०१५ला या प्रकरणाच्या कटात कथितरीत्या सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. इंद्राणी या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. २४ एप्रिल २०१२ रोजी इंद्राणीने एका कारमध्ये कथितरीत्या शीनाची गळा दाबून हत्या केली होती आणि तिचा मृतदेह जाळल्यानंतर रायगड जिल्ह्यातील जंगलात त्याची विल्हेवाट लावली होती.विभक्त करण्याचा कट फसलाशीना बोरा हत्याकांडप्रकरणी सीबीआयने ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात ५२ साक्षीदारांची नावे आहेत. २००९पासून शीना आणि राहुल यांना विभक्त करण्याचे प्रयत्न सुुरू होते. ते कुठल्याही दबावापुढे झुकायला तयार नसल्याचे पाहून इंद्राणी आणि पीटर यांनी शीनाला संपवण्याचा कट रचला, असे आरोपपत्रात नमूद असल्याचे सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.