मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयात दुसरे पुरवणी दोषारोपपत्र सादर केले. या केसमधील मुख्य आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जीने शीनाच्या हत्येचे ठिकाण आणि तिचा मृतदेह कोणत्या ठिकाणी पुरला, याची तपशीलवार माहिती फोनवरून पीटर मुखर्जीला दिल्याचा दावा सीबीआयने या दुसऱ्या पुरवणी दोषारोपपत्राद्वारे केला आहे.सुमारे २०० पानी पुरवणी आरोपपत्र सीबीआयने न्यायालयापुढे शुक्रवारी सादर केले. शनिवारपासून आरोप निश्चितीस सुरुवात होईल. शनिवारी सीबीआय आपली केस मांडण्यास सुरुवात करेल. दोषारोपपत्रानुसार, इंद्राणी व पीटर राहुल व शीनाच्या प्रेमसंबंधांविरुद्ध होते. यावरून पीटर त्याचा मुलगा राहुलबरोबर भांडत असे. (प्रतिनिधी)
'हत्येचे ठिकाण पीटरला माहीत होते'
By admin | Published: October 22, 2016 1:24 AM