Join us

पीटर मुखर्जीची अखेर चार वर्षांनी तुरुंगातून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 6:11 AM

६ फेब्रुवारीच्या सुनावणीदरम्यान पीटर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी किंवा प्रथम दर्शनी पुरावा नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केली होती.

मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी याची अखेर चार वर्षांनी आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली आहे. मुखर्जी यांना जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला अपिलासाठी सहा आठवड्यांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल न केल्याने मुखर्जी यांची सुटका झाली आहे.६ फेब्रुवारीच्या सुनावणीदरम्यान पीटर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी किंवा प्रथम दर्शनी पुरावा नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केली होती. शुक्रवारी पीटरच्या वकिलाने सुटकेची विनंती केली. सीबीआयकडून कुठलेही पाऊल न उचलल्याने त्याची कारागृहातून सुटका करण्यात आली. शिवाय त्यांना देश सोडून जाता येणार नाही याबाबतचे निर्देश देण्यात आले.

टॅग्स :गुन्हेगारी