पीटर मुखर्जीच्या कोठडीत वाढ

By admin | Published: December 1, 2015 04:13 AM2015-12-01T04:13:57+5:302015-12-01T04:13:57+5:30

शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी अटकेत असलेला आरोपी पीटर मुखर्जी याच्या पॉलिग्राफिक चाचणीचा अहवाल मंगळवारी मिळणार आहे. त्यामुळे पीटरच्या कोठडीत एक दिवसाची वाढ

Peter Mukherjee's custody in custody | पीटर मुखर्जीच्या कोठडीत वाढ

पीटर मुखर्जीच्या कोठडीत वाढ

Next

मुंबई : शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी अटकेत असलेला आरोपी पीटर मुखर्जी याच्या पॉलिग्राफिक चाचणीचा अहवाल मंगळवारी मिळणार आहे. त्यामुळे पीटरच्या कोठडीत एक दिवसाची वाढ करण्याची सीबीआयची मागणी न्यायालयाने सोमवारी मान्य केली. पॉलिग्राफिक अहवालानंतर तपासाची पुढील दिशा निश्चित होणार आहे.
पीटरच्या सीबीआय कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास महानगर दंडाधिकारी न्यायाधीन आर.व्ही.अडोने यांच्यासमोर हजर केले होते. यावेळी सीबीआयचे विशेष वकील बी.बी. बदामी यांनी न्यायालयासमोर पीटरच्या कोठडीत चार दिवसांची वाढ करण्याची मागणी केली. तपास अधिकाऱ्यांचा दिवस रात्र, मुंबई ते दिल्ली असा प्रवास सुरू असून, आणखी सबळ पुरावे मिळण्यासाठी बदानी यांनी चार दिवसांच्या कोठडीची मागणी केली. त्याला अ‍ॅड. मिहिर घिवाला यांनी विरोध केला. पीटर गेले १० दिवस सीबीआयच्या ताब्यात असून, त्याच्याकडे कसून चौकशी केलेली आहे. त्यासाठी त्याने तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्यही केले असल्याने केवळ पॉलिग्राफिक चाचणीचा अहवालासाठी पीटरच्या कोठडीत वाढ करणे चुकीचे आहे. सीबीआयला ज्या तपासासाठी पीटरची वाढीव कोठडी देण्यात आली होती, तो तपासाचा तपशील सीबीआयने न्यायालयासमोर सादर केला नाही. शीनाच्या नावे सिंगापूर, हाँगकाँगमध्ये पासपोर्ट जमा असून, शीना किती वेळा या दोन्ही देशांमध्ये किंवा विदेशात जाऊन आली हे सीबीआयने स्पष्ट करावे. शीना विदेशात गेलीच नसेल, तर तिचे बँक खाते कोणी आणि कसे उघडले, याचा आधी सीबीआयने शोध घ्यावा, अशी मागणी घिवाला यांनी केली.

कागदपत्रे ताब्यात
पॉलिग्राफिक चाचणीच्या अहवालाच्या आधारे आरोपी पीटर याचा शीना बोरा हत्याकांडातील सहभाग उघड होण्यास मदत होणार आहे. पीटर आणि इंद्राणीने कंपन्यांच्या माध्यमातून शीना व विधी यांच्या सिंगापूर, हाँगकाँगमधील बँक खात्यांमध्ये वळविलेल्या रकमांचाही तपशील, बँक स्टेटमेंट यासह महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतलेली आहेत.

Web Title: Peter Mukherjee's custody in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.