Join us

‘फोर जी’ विरोधात पेटतेय जनआंदोलन!

By admin | Published: March 16, 2015 11:01 PM

मुंबई महानगर पालिका प्रशासनाने रिलायन्सला ‘फोर जी’ मोबाईल टॉवर उभारण्याची परवानगी दिल्यानंतर आता या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे.

मुंबई : मुंबई महानगर पालिका प्रशासनाने रिलायन्सला ‘फोर जी’ मोबाईल टॉवर उभारण्याची परवानगी दिल्यानंतर आता या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे. पूर्व उपनगरातील स्वयंसेवी संस्थांसह व्यक्तीश: देखील ‘फोर जी’ मोबाईल टॉवरला विरोध दर्शविण्यात येत आहे. याप्रकरणी स्वयंसेवी संस्थांची बाजू ऐकण्यात यावी, असा सूर लगावला जात आहे. ‘फोर जी’ टॉवर विरोधातील जनभावना लक्षात घेऊन ‘लोकमत’ने देखील या आंदोलनांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याचे ठरविले आहे. ग्लोबल मोबाईल सप्लायर्स असोसिएशनच्या एका अहवालानुसार, २०१४ साली जगभरात ‘फोर जी’ मोबाईल टॉवर सेवा पुरविणाऱ्या पुरवठादारांची संख्या ३६ टक्क्यांनी वाढली. त्यापैकी ४४ टक्के पुरवठादार १८०० एमएचझेड बँड सेवेचा वापर करत आहेत. शिवाय २०१४ सालापर्यंत तब्बल १२४ देशांत ‘फोर जी’ मोबाईल टॉवर्सचे जाळे पसरले असून, भारती एअरटेल, आयडिया सेल्यूलर, व्होडाफोन आणि रिलायन्स या खासगी कंपन्यांत ‘फोर जी’ मोबाईल टॉवर्स सेवा पुरविण्यासाठी स्पर्धा आहे. दुसरीकडे मुंबईतील १ हजार १०६ मोकळ्या भुखंडावर मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. आणि त्याचा सर्वाधिक फटका माटुंगा, चेंबूर, सायन, भांडुप, घाटकोपर, मुलुंड येथील नागरिकांना बसणार आहे. येथील उद्यानांत तब्बल ३१ मोबाईल टॉवर्स उभारण्याचे प्रस्तावित आहे. उद्यानांसह मोकळ्या मैदानात उभारण्यात येणाऱ्या मोबाईल टॉवर्सला प्रखर विरोध होऊ लागला आहे.‘फोर जी’ किरणोत्सर्गाचा धोका ओळखून सामाजिक संस्थांनी आपला विरोध दर्शवल्याने याविरोधात मोठे जनआंदोलन आकार घेत आहे. महापालिका आणि संबधित कंपनीने बैठक घेत याबाबत ठोस माहिती द्यावी. शिवाय मोकळ्या मैदानांसह उद्यानात ‘फोर जी’ मोबाईल टॉवर्स उभारण्याबाबत नक्की काय भूमिका आहे? हे विषद करावे, असे विविध संघटनांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)‘फोर जी’ टॉवरने दुष्परिणामाचा नाहक त्रास होत आहे. भांडुपमध्ये खेळण्यासाठी एकमेव असलेल्या माँसाहेब मीनाताई ठाकरे मैदानात उभारलेल्या टॉवरमुळे भीतीने मुलांनी तेथे जाणे बंद केले आहे. याविरोधात ३ हजार नागरिकांच्या राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेचे पत्र मुख्यमंत्र्यांसह सर्वांना देण्यात आले आहे. मात्र कोणीही मदतीसाठी पुढाकार घेतलेला नाही.-मनोहर शिंदे, अध्यक्ष, सरदार प्रतापसिंग संकुल, भांडुपचेंबूरमधील ‘फोर जी’ मोबाईल टॉवर्स उभारण्याच्या आम्ही विरोधात आहोत. आम्ही आंदोलन हाती घेतले आहे. ७५ टॉवर तर दूर आम्ही एक मोबाईल टॉवरदेखील उभा राहू देणार नाही. महापालिकेने दहा दिवसांत याबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्रकरू.- बाबासाहेब गोपले, अध्यक्ष, अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडीम्हाडा संकुलानात १ टॉवर असताना त्यात ‘फोर जी’ टॉवरची भर घालण्यात येत आहे. मात्र येथे ‘फोर जी’ टॉवर आम्ही उभा राहू देणार नाही. यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. - रवींद्र नाईक, अध्यक्ष, मुलुंडरहिवाशांना विश्वासात न घेताच पालिकेने ‘फोर जी’ टॉवर्संना परवानगी दिल्याने चेंबूरमधील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. लवकरच जनहित याचिका दाखल करणार आहोत.- सुभाष मराठे, मुख्य निमंत्रक, चेंबूर ‘फोर जी’ ला विरोध चुकीचा आहे़ कारण प्रगतीच्या स्पर्धेत आपण मागे पडायला नको़ याआधीही ‘थ्री जी’ आले तेव्हा विरोध झालाच होता़ फास्ट नेटर्वकसाठी ‘फोर जी’ हवेच.- अनुप जाधव, टूर आॅपरेटरनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास केल्यावरच अंमलबजावणी झाली पाहिजे़ एखाद्या तंत्रज्ञानचे दुषपरिणाम होत असल्यास ते विकसित न करणे योग्य ठरेल़ त्यामुळे ‘फोर जी’ आणण्याआधी त्याची नीट चाचपणी झाली पाहिजे़- शैलेश पवार, ट्रेडर